मार्चमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा नवी मुंबई महापालिकेने केला सन्मान

03 Apr 2025 14:24:47
 
 mar
नवी मुंबई, 2 एप्रिल (आ.प्र.) :
 
सेवानिवृत्ती हा आयुष्यातील फक्त एक टप्पा असून, यानंतरच्या काळात कामाच्या व्यस्ततेमुळे राहून गेलेल्या आपल्या मनातील गोष्टींना, कुटुंबीयांना भरपूर वेळ द्या. वेळेचे आणि अर्थकारणाचे योग्य नियोजन करा आणि आनंदी आयुष्य जगा, अशा शब्दांत परिमंडळ-2चे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांनी मार्चमध्ये सेवानिवृत्त झालेले 5 अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. नवी मुंबई महापालिका मुख्यालयात झालेल्या या समारंभास महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, भांडार विभागाचे उपायुक्त शंकर खाडे, विधी अधिकारी अभय जाधव आणि अधिकारी, कर्मचारी; तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. जीवनाचे सार सांगणारी कविता बाविस्कर यांनी सादर केली. विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव पाटील, उपमुख्य स्वच्छता अधिकारी सतीश सनदी, शिक्षिका पुष्पा वाघमारे, आरोग्य पर्यवेक्षक पांडुरंग येमले व जोडारी दत्तात्रय दैवज्ञ या 5 अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0