होतकरू मुलींना मदत करीत ब्राह्मण महासंघाने उभारली माणुसकीची गुढी

    02-Apr-2025
Total Views |
 
ddd
 
नांदेड सिटी, 1 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ (पुणे जिल्हा) या संस्थेने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर दोन गरीब होतकरू मुलींना नवीन सायकली भेटस्वरूपात दिल्या; तसेच या मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. या मुलींपैकी एकीचे पालकाचे छत्र हरवले असून, दुसरीच्या घरची परिस्थिती गरिबीची आहे. नांदेड सिटी भागात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप प्रदेश प्रवक्ता व उद्योजक संदीप खेडकर आणि महाराष्ट्र टाइम्सचे वृत्तसंपादक श्रीपाद ब्रह्मे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे यांनी असे शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांचे स्किल डेव्हलपमेंट यावर भर देत अनेक सामाजिक, शैक्षणिक, उपक्रम महासंघाद्वारे राबवले जातील, असे सांगून दानशूर व्यक्तींना यासाठी आवाहन केले. पर्यावरण अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. महिला आघाडी अध्यक्ष केतकी कुलकर्णी यांनी महासंघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमाला नांदेड सिटी शाखा, वारजे शाखा, धायरी शाखा येथील अनेक पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.