मोरवाडीमधील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा45वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

    02-Apr-2025
Total Views |
 
 mor
पिंपरी, 1 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 1980 मध्ये उभारलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा 45वा वर्धापन दिन रविवारी (30 मार्च) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने मोरवाडीतील ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी काकड आरती, विष्णू महाराज वाघ (आळंदी) यांचे कीर्तन, महाप्रसाद आणि सायंकाळी मोरजाई देवी महिला भजनी मंडळाचे भजन यामुळे भक्तिमय आनंदी वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सर्व सांप्रदायिक मंडळींचे मोरवाडी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत व आभार मानण्यात आले.