गरजू महिलांना 85 शिलाई मशीनचे वितरण

    28-Mar-2025
Total Views |
 
 rot
 
पुणे, 27 मार्च (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड मार्फत गरजू महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ‌‘सुई धागा' या प्रोजेक्टअंतर्गत 85 शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. पीआरजीएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्फत या प्रोजेक्टसाठी आवश्यक फंडिंग करण्यात आले. सोमवारी, 17 मार्चला नवी पेठेतील निवारा वृद्धाश्रमामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूडचे अध्यक्ष रोटेरियन मनीष दिडमिशे, सर्विस प्रोजेक्ट डिरेक्टर रोटेरियन सुषमा कुलकर्णी, सुई धागा चेअरपर्सन नीना पांगारकर, सुई धागा कमिटी मेंबर पार्टनर नीलिमा आपटे, पार्टनर मनीषा दिडमिशे, पार्टनर रमा लेले यांच्यासोबतच पीआरजीएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे एचआर डिरेक्टर छावी सिन्हा, फायनान्स डिरेक्टर प्रथमेश पूरकर, प्रोजेक्ट डिरेक्टर रसिका राकेश, सीनियर मॅनेजर हिमांशू खोले आणि सेवा सहयोग डब्ल्यूईपी यांच्या प्रतिनिधी माधुरी नागरस, शैलेश घाटपांडे, मकरंद सातभाई, तसेच रीच ट्रस्टच्या ट्रस्टी नीलिमा पाटील आणि स्वपरिवर्तनाच्या ट्रस्टी दीपा लिमये उपस्थित होत्या.
 
या कार्यक्रमाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड अंतर्गत सुई धागा प्रोजेक्टच्या चेअर पर्सन नीना पांगारकर म्हणाल्या, ‌‘रोटरी क्लब मार्फत नेहमीच विविध प्रोजेक्ट केले जातात. मागील वर्षापासून सुरू केलेला या सुई धागा प्रोजेक्टला खूपच छान सपोर्ट मिळाला.
 
यावर्षी सुई धागा प्रोजेक्ट अंतर्गत 85 महिलांना शिलाई मशीन देण्यात आल्या आणि या मशीन घेण्याकरता पीआरजीएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मार्फत सीआरएस फंडिंग मिळाले. पीआरजीएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सीनियर मॅनेजर हिमांशू खोले म्हणाले की, पीआरजीएस ही संस्था अमेरिकन असून, गेल्या पंधरा वर्षांपासून भारतात कार्यरत आहे. प्रत्येक वर्षी सामाजिक कर्तव्य म्हणून समाजासाठी कंपनीमार्फत विविध उपक्रम राबवले जातात.