मुलांच्या मेंदूचे व मनाचे शत्रू स्मार्टफाेन मुळेच निर्माण हाेतात

    18-Mar-2025
Total Views |
 


Kids
 
 
 
रिपाेर्टमधील उल्लेखानुसार, काही मुलांना 10 वर्षे वयाच्या आत स्मार्टफाेन वापरायला मिळताे.त्यांच्यापैकी 60 ट्नके मुलांना अस्वस्थता, चिंता, राग, भास, आत्महत्येचे विचार व अशा अनेक मानसिक आजारांना सामाेरे जावे लागते.परिणामी, त्यांच्या मेंदूची काम करण्याची क्षमता कमी कमी हाेत जाते. याच वयाेगटातील मुलींच्या बाबतीत अशीच मनाची स्थिती हाेण्याचे प्रमाण आहे, 65 ट्नके.मानसाेपचारतज्ज्ञ ए. जाेसेफ, ‘काेव्हिडनंतर मुलांचा ‘स्क्रीन टाइम हा तिपटीने वाढला आहे.त्यात स्मार्टफाेन बराेबरच, गेमिंग व टॅब्सचाही समावेश आहे. याचाच अर्थ, ही छाेटी मुले केवळ माहिती देण्या-घेण्याकरिता फाेन्सवापरत नसून ‘बेटिंग’ व ‘सेक्स’साठी देखील त्याचा उपयाेग करत आहेत.
 
ज्या प्रमाणात त्यांच्याकडे माहिती येत आहे, त्याचा परिणाम त्यांचा मेंदू गाेंधळून टाकणे व ताे थकून जाणे, एवढाच हाेताे. मुलांच्यात आणि मुलींच्यात स्क्रीन टाईमचे भिन्न परिणाम दिसून येतात. मुलांचा जास्त वेळ, स्मार्टफाेन्सवर ‘गेम्स’ खेळण्यात जाताे. मुली त्यांचा जास्त वेळ साेशल मीडियावर घालवतात.’ ‘मुलांमध्ये ‘आक्रमकता’ तर मुलींच्यात ‘राग’ वाढत असल्याचे दिसते.मुलींमध्ये स्वतःची आभासी प्रतिमा, इतरांशी तुलना व स्पर्धा, या सारख्या विषयांमुळे चिडचिड, राग व बदलते ‘मुड्स’ प्रामुख्याने दिसतात. सेक्स व काॅमेंट्समुळे त्यांना अशा ताणाला सामाेरे जावे लागते, जे त्यांच्या लहान वयात त्यांना झेपू शकत नाहीत. वाढलेला स्क्रीन टाइम, मुलांची झाेप कमी किंवा खराब करताेय. ही मुले फाेनला जवळ करून, आपल्या कुटुंबापासून व मित्र - मैत्रिणींपासून दुरावत आहेत.
 
त्यांची भावनिक- सामाजिक वाढ हाेण्यासाठी या वेळेचा सदुपयाेग हाेणे, फारच गरजेचे आहे.’ डाॅ.तारा त्यागराजन.ज्या मुलांचा स्क्रीन टाइम, जास्त करून ‘गेमिंग’ व ‘गॅम्बलिंग’वर जाताे, त्यांना (त्यांच्याच शब्दात सांगायचे तर) ‘स्माेकिंग’, ‘ड्रिंकिंग’, ‘ड्रग्ज’ व विनाकारण खर्चिक खरेदी, यासारखी व्यसने लागायची दाट शक्यता असते. मुलांच्या मेंदूचे आणि मनाचे हजाराे शत्रू स्क्रीनवरून त्यांना प्रभावित करतात, त्यांना नादी लावतात, मानसाेपचारतज्ज्ञ.‘काेव्हिड 19नंतर, मैदानावर खेळणारी मुले, सातत्याने स्क्रीनसमाेर तासनतास बसू लागली.माेठा परिणाम म्हणजे त्यांच्यात अपेक्षित असणारी वयानुसार वाढ हाेण्याचा वेग खूपच कमी झाला,’ 10 वर्षीय मुलाचे पालक, मैथिली केळकर. ‘यात दाेष शाळांचाही आहे, ज्या अभ्यासक्रम, हाेम वर्क, प्राेजेक्ट्स इत्यादी बरेचसे काम स्मार्टफाेन व टॅब्सवरच देतात. तसेच, माेठा दाेष पालकांचाही आहे, जे सुरुवातीला मुलांच्या हातात स्मार्टफाेन स्वतःहून देतात.
 
मुलांना त्याचे फायदे व ताेटे समजावून सांगण्याएवढी पारदर्शकता त्या दाेन पिढ्यांमध्ये नसते.’ ‘मुले स्मार्टफाेनवर एकटी असताना, त्या वापरावर पालकांचे लक्ष असलेच पाहिजे. ‘पॅरेंटल कंट्राेल्स’ व ‘फिल्टर्स’चा उपयाेग करून काही ‘अ‍ॅप्स’ना ‘लाॅक’ करता येते, तसेच मुलांनी काय काय पाहिले, यावरही नजर ठेवता येतेसाहजिकच, मुले जे काही चुकीचे पाहणार असतील, त्यावर आपाेआपच नियंत्रण येते.’ डाॅ. त्यागराजन. ‘सध्या एआय. आधारित तंत्रज्ञान स्मार्टफाेनपर्यंत पाेहाेचत आहे. अशा काळात, मुलांना या तंत्राच्या ‘गॅजेट्स’पासून दूरही ठेवता येणार नाही. या दाेन्हींचे संतुलन ठेवणे, पालकांना, शिक्षकांना व समाजालाही माेठे आव्हान आहे.या समस्येला साेडवण्याकरिता सकारात्मक पाऊल टाकण्यासाठी, अमेरिकेच्या त्या संशाेधनातील एका वाक्यापासून सुरुवात करता येईल. ‘मुलांच्या मानसिक स्थैर्यासाठी त्यांना स्मार्टफाेन जेवढ्या उशिरा देता येईल तेवढा द्यावा!’