प्रत्येक नाते जपण्यासाठी खास असते चहाची वेळ

    17-Mar-2025
Total Views |
 
 


Tea

मानसाेपचार तज्ज्ञांच्या मते, काेणतयाही माणसासाठी चहाची वेळ खास वेळ असते.टी-टाइम फक्त कपल्ससाठीच खास नसते तर दाेन बहिणींसाठी, सासू-सुनेसाठ बहिण-भाऊ अशा सर्वांसाठी महत्त्वाची असते.चहाची वेळ अशी असते की, त्यावेळी आपण आपला मेंदू रिलॅ्नस करीत असताे.हीच ती वेळ असते की जेव्हा पती-पत्नी आपल्या मुलांसाेबत घरच्या, कामाधंद्याच्या साऱ्या गाेष्टींबाबत सल्लामसलत करतात. चहाच्या वेळी बहुतेक पतींना वाटत असते की, त्यांच्या पत्नीने काेणत्याही वाद-भांडणाच्या व काैटुंबिक ्नलेशाविषयी न बाेलता मनाला आनंद देणाऱ्या गप्पा माराव्यात.
 
कर्मचारी असाे वा कपल्स जर चहा पितानाही कामाविषयी बाेलाल तर मनाला समाधान वाटणार नाही आणि एकापेक्षा जास्त कप चहा पिऊनही मनाला समाधान वाटू शकणार नाही. टी-टाइम फक्त कुटुंबातच महत्त्वाचा नसून कामाच्या जागीही महत्त्वाचा असताे.
ऑफिसात दाेन माणसे एकत्र जाऊन चहा पितात तेव्हा एकमेकांना समजतात. त्यांचे आपसातील नाते बळकट हाेते.जर आपण खऱ्या अर्थाने चहाचा अर्थ समजला तर ताे नात्यांना प्राेत्साहन देणारा वेळ आहे. कित्येकदा नात्यांचा कडवटपणा दूर करण्याची सबबही चहा बनताे. चहाच्या नावाखाली घरातील लाेक असाेत वा ऑफिसात काम करणारे एकमेकांच्या जवळ येत असतात.