स्वत:च करू शकता परेक्ट ऑइल मसाज

    17-Mar-2025
Total Views |
 

Health 
 
किंचित गरम तेल केसांत व डाेक्यामध्ये जास्त चांगल्याप्रकारे अ‍ॅब्साॅर्ब हाेत असते, पण हे काेमट असावे. जास्त गरम नसावे.
 
तेल लावण्याची पद्धत : डाेके तेल पित असते. यामुळे हलक्या हातांनी संपूर्ण डाेक्यावर सावकाश मसाज करावा. एक छाेटा रुईचा ाया घेऊन तेलात बुडवून त्याने डाेक्यावर तेल लावण्यास सुरुवात करावी. तेल असे लावावे की आजूबाजूने ओघळणार नाही. डाेक्याला लागल्यानंतर केसांना लावावे. ज्यामुळे केसांची इलॅस्टिसिटी व चमक टिकून राहील. केसांमध्ये रबिंग माेशनमध्ये तेल लावावे. ज्यामुळे प्रेशर पडल्यास केस तुटणार वा गळणार नाहीत.
 
मसाज : केसांना तेल लावून मसाज केल्यास तेल मुळांच्या आतपर्यंत शाेषून घेतले जाते. यामुळे डाेक्यातील र्नताभिसरण वाढते व केसांमध्ये लस्टर निर्माण हाेते. केसांच्या क्वालिटीतही सुधारणा हाेते.
 
वेळ : रिसर्च सांगते की, तेल अर्धा तास लावल्यामुळेही त्याचा संपूर्ण ायदा मिळताे. जास्त परिणाम हाेण्यासाठी केसांना स्टीम द्या.
यासाठी गरम पाण्यात भिजवलेला टाॅवेल बांधू शकता. रात्री तेल लावून झाेपल्यासही डाेके रात्रभर तेल उत्तम प्रकारे शाेषून घेत असते.