फिल्म सिटीत आयआयसीटीची उभारणी करणार

    17-Mar-2025
Total Views |
 
 
 

Film 
देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नाॅलाॅजी (आयआयसीटी) मुंबईत गाेरेगाव येथे उभारण्यात येईल.यासाठी केंद्र शासन 400 काेटींची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.देशाचे माध्यम आणि मनाेरंजन क्षेत्र जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृक्श्राव्य मनाेरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज परिषद) पहिल्या सत्राचे आयाेजन सुषमा स्वराज भवन येथे करण्यात आले आहे. या सत्रात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.जागतिक स्तरावर हाेणाऱ्या या पहिल्या परिषदेचे यजमानपद महाराष्ट्राला मिळाले असून, राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईत 1 ते 4 मेदरम्यान ही परिषद हाेणार आहे.
 
शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राचे आयाेजन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने केले असून, या सत्रात विविध देशांचे राजदूत आणि उच्चायु्नत सहभागी झाले हाेते. परराष्ट्र मंत्री डाॅ. एस.जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री डाॅ. एल.मुरुगन आणि मुख्यमंत्र्यांनी विचार मांडले.यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय व महाराष्ट्र शासनादरम्यान वेव्हज-2025 निमित्त सामंजस्य करार झाला.मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नाॅलाॅजीची (आयआयसीटी) स्थापन करण्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब बनवण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश असून, याबाबत केंद्र 400 काेटींचा निधी देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. संपूर्ण देशाच्या सर्जनशील तंत्रज्ञानाला यामुळे नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्य्नत केला.