मानसविशेषज्ञांच्या मते 80,000 पेक्षा जास्त माेबाइल अॅप्लिकेशनला एज्युकेशनलचा हक्क मिळाला आहे.यापैकी आपल्या मुलासाठी सर्वाेत्तम निवड करावी व त्याला डिजिटल जगाच्या या भागाची ओळख करून द्यावी. डिजिटल जगाच्या या भागाचा परिचय करून मुले स्वत:चा विकास करू शकतात हे त्यांना माहीत असावे. यापैकी काही अॅप्लिकेशनची नावे आहेत बॅजूज, स्टडी गियर, मेरिट नेशन. लक्षात ठेवा की सारे काही करतानाही आपल्याला मुलाच्या डिजिटल अॅ्निटव्हिटीची पूर्ण माहिती ठेवायला हवी. मुलाला हे माहीत असावे की, त्याच्यावर काेणाची तरी नजर आहे., ताे काहीही पाहण्यास स्वतंत्र नाही. तसेच त्यांना त्याच्या खरेपणाचा परिचय करवण्याचा प्रयत्न करावा.
उदा. मुले कार्टून पाहून ते खरे मानतात. अशावेळी त्यांना ते खरे नसून फ्नत हसण्यासाठी असल्याचे सांगावे.मुलाच्या वागण्यावर लक्ष ठेवावे आपण मुलांना सतत छातीशी धरून ठेवू शकत नाही.जसजशी मुले माेठी हाेतात त्यांच्या हालचाली वाढतील व ती एकटी अनक जागी जाण्यास सुरुवात करतील.सहावी-सातवीत येता येता मुले एकटी ट्यूशन वा वेगवेगळ्या हाॅबी ्नलासला जाण्यास सुरुवात करतात.मित्रांसाेबत हिंडणेफिरणेही यानंतर काही वर्षांतच सुरू हाेते. अशा स्थितीत आपण फाेनद्वारे मुलांशी संपर्क करू शकताे. काही स्मार्टफाेनमध्ये सुरक्षा अॅप असतात.ज्याद्वारे आपण मुलांचे लाेकेशन जाणू शकता. ती संकटात असल्याचे आपल्याला समजू शकते.
जबाबदारीची शिकवण मुलांना महाग स्मार्टफाेन देण्यापूर्वी आपण हजारदा विचार करायला हवा. पण याचे फायदेताेटे पाहिले तर हा फाेन मुलाला पूर्वीपेक्षा थाेडे जास्त जबाबदारही बनवील. थाेडा विचार करून पहा. जी वस्तू मुलांना एवढी जास्त आवडते ती सुरक्षित ठेवण्यासाठीही ताे पूर्णपणे सावध राहील. आपण स्मार्टफाेन पैसा, बजेटिंग व अवाजवी खर्च न मानता फायदे-ताेटे शिकवण्याचे माध्यमही बनवू शकता. मुलाला फॅमिली सेलफाेन प्लॅनमध्ये सामील करा व एक महिन्यात ताे किती डाटा वापरू शकताे हे त्याला सांगा. जास्त डाटा वापरल्यास शिक्षा म्हणून त्याचा पाॅकेटमनी कमी करा वा त्याच्यावर घरकामाची जास्त जबाबदारी टाका.