आपल्या वाचनाची आवड आपल्याविषयी खूप काही सांगते

    15-Mar-2025
Total Views |
 

Reading 
 
आपल्याला वाचनाची आवड असेलच.वाचनाबाबत प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते.आपल्या वाचनाची आवड आपल्याविषयी खूप काही सांगून जात असते. त्या संदर्भात केलेली ही छाेटीशी वर्गवारी.
 
1. आत्मकथांची आवड : एखाद्या माेठ्या लेखकाचीच पुस्तके वा आत्मकथा वाचत राहण्याचा अर्थ अशी माणसे लाेकांना वरवर नाही तर खाेलवर जाणणे पसंत करीत असतात. त्यांना व्यक्तीचा प्रत्येक पैलू माहीत करून घेणे पसंत असते. तसेच जीवन साधेपणाने जगणे त्यांना आवडते.
 
2. कथा-गाेष्टींची आवड : ही शैली आवडणारे अत्यंत सर्जनशील असतात. ते भव्यतेने व कल्पनेने बनलेले जग वाचणे पसंत करतात. हे दिवास्वप्नात हरवलेले राहतात. काम वा वाचन करतानाही धाडसी कामाची कल्पना करीत राहतात. मैत्रीचा खरा अर्थ जाणत असल्यामुळे मित्रांसाठी नेहमी सज्ज असतात.
 
3. राेमांचकतेची आवड : रहस्य व राेमांचकता आवडणे म्हणजे जीवनात राेमांचकता शाेधणे. हे प्रत्येक गाेष्टीचे सूक्ष्म परीक्षण करतात. काेणत्याही कामाचा साहसी पैलू यांना जास्त आकर्षित करताे. काेणालाही लवकर मित्र बनवतात. मित्र व प्रियजनांच्या संकटकाळात नेहमी साथ देतात.
 
4. इतिहासाचे चाहते : यांना काल्पनिक गाेष्टी आवडत असतात पण ऐतिहासिक गाेष्टींचीही तितकीच आवड असते. आजुबाजूला व काेठे काय घडत आहे याची त्यांना नेहमी उत्सुकता असते. त्यांच्याकडे प्रत्येक कामाचे प्लॅनिंग असते. पण ते अचानक समाेर आलेल्या कामाने गांगरून जात असतात. आपल्या प्रत्येक कामावर तीक्ष्ण नजर ठेवणे यांचे वैशिष्ट्य आहे. अशा लाेकांची सर्वांवर नजर असते व त्यांना आपल्या मित्रांकडून व कुटुंबीयांकडून त्यांच्या भूतकाळातील गाेष्टी ऐकणे आवडते.
 
5. हास्य-व्यंग प्रिय : हे लाेक मैफलीची शान असतात. अनेकदा हजरजबाबीने सर्वांना चकीत करतात.सामान्यत: हे जरा स्मार्ट असतात. व प्रतिकूल परिस्थितीत स्वत:ला कसे शांत राखावे हे जाणत असतात. आपल्या स्वच्छंदी व खेळकर शैलीने हे शत्रुलाही आपल्या बाजूने करून घेतात.