स्वतःला दुर्लक्षितही करू नका

    14-Mar-2025
Total Views |
 

thoughts 
 
समाजात आपण कसे वावरताे, कसे वागताे, कसे बाेलताे याला फार महत्व असते. आपल्या एकूण व्यक्तीमत्वाची ओळख त्यावरूनच पटत असते.समाजात वावरताना तुम्ही जरा विनाेदी राहा. त्याचा फायदा हाेताे.सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रचंड ताणतणाव वाढला आहे. शिवाय चार डाेकी भेटली, की कायम गंभीर विषयांवर चर्चा केली जाते. अशा वेळी एखादा विनाेद तुम्हाला वेगळे परिमाण देऊन जाताे. पण उपस्थित असलेल्या लाेकांमध्ये तुम्ही केलेला विनाेद किती साजेशा, समंजस आहे हे आधी तपासून घ्या. नाहीतर हसे करुन घ्याल. इतरांचा आदर राखा. भारतात आदर या शब्दाला प्रचंड महत्त्व आहे.
 
जर तुम्ही समाेरच्या व्यक्तीला आदर दिला, सन्मान दाखवला तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी झळाळी मिळते. त्याच्या मनातील तुमचे स्थान अधिक बळकट हाेते. त्याचा तुम्हाला भविष्यात लाभ हाेताे. समाेरच्या व्यक्तिशी संवाद साधताना, बाेलताना अगदी कंम्फरटेबल राहा. तुमच्या बाॅडिलँग्वेजवर भर द्या. त्यातून तुम्ही प्रभावी संभाषण साधू शकता. आपले मुद्दे पटवून देऊ शकता. भाषण करतानाही बाॅडी लँग्वेजला खुप महत्त्व आहे. एखाद्या इव्हेंटनुसार आपले ड्रेसिंग ठेवा. ऑफिसला जाताना साजेशे कपडे घाला. रात्रीची पार्टी असेल तर पार्टी लुकमध्ये जरा माॅर्डन दिसण्याचा प्रयत्न करा. कलिग्जसाेबत बाहेर फिरायला जाणार असाल तर कॅज्युअल्स घाला. नेहमी आत्मपरिक्षण करा.
 
आत्मपरिक्षण अत्यंत आवश्यक आहे. त्यातून तुमच्या चांगल्या वाईट बाबी समाेर येत असतात. तुम्ही खरंच चुकताय की बराेबर आहात, हे तुम्हाला समजून येते. तुम्ही मार्गक्रमण करीत असलेला मार्ग याेग्य की दुसरा मार्ग पकडायला हवा, हेही समजते.
आत्मविश्वास हा असायलाच हवा.आपल्या गुणांची आपल्याला पारख हवीच. पण ओव्हर काॅन्फिडन्ट राहू नका. त्यात तुमचे नुकसान असते.पण स्वतःला दुर्लक्षितही करु नका.अन्यथा तुमच्या गट्स असतानाही तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकले जाता.सर्वाेत्तम राहण्याची क्षमता असतानाही मागच्या रांगेत उभे राहता. तेव्हा बी काॅन्फिडन्ट. जगावर मात करा.