हे छायाचित्र न्यूयाॅर्कच्या कॅटस्किल्स भागात असलेल्या फाेएनिशिया स्टेशनचे आहे. इथे रेल बायकिंगच्या माध्यमातून पर्यटक जुन्या रेल्वे ट्रॅकवर सायकल चालवताना नैसर्गिक साैंदर्याचा आनंद घेतात. फाेएनिशिया स्टेशनपासून रेल बाइक प्रवासाची सुरुवात हाेते. हा प्रवास 12 किमीची राउंड ट्रिप आहे. त्यात प्रवाशांना नद्या, डाेंगर आणि जंगलांतील विलक्षण दृश्ये पाहता येतात. या राेमांचक रेल बायकिंगची सुरुवात सन 2017मध्ये झाली हाेती. त्यात विशेष रूपाने डिझाइन केलेल्या रेल बाइकचा उपयाेग केला जाताे. या रेल बाइकला पेडलचा वापर करून चालविले जाते. प्रत्येक निसर्गप्रेमीसाठी हा एक नवीन अनुभव असताे.