मुलींच्या जन्मदर वाढीसाठी कायदे कडक करणार

09 Feb 2025 13:23:46
 
 

Child 
 
कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती : विकासासाठी निरंतर वाटचाल कृतिसत्राचे उद्घाटनराज्य शासन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व सक्षमीकरणासाठी अनेक प्रभावी याेजना राबवत आहे.या याेजनेसाेबत मुलींचा जन्मदर कमी हाेऊ नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. येत्या काळात स्त्रीभ्रूणहत्येला आळा घालण्यासाठी आणि मुलींच्या जन्मदारवाढीसाठी पीसीपीएनडीटी कायदा अधिक प्रबळ करणार आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक आराेग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयाेजित विकासासाठी निरंतर वाटचाल, बीजिंग चाैथे विश्व संमेलनानंतरची तीस वर्षे : कृतिसत्र या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आबिटकर बाेलत हाेते.
 
यावेळी उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे, सार्वजनिक आराेग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना बाेर्डीकर, आयाेगाच्या अध्यक्ष अ‍ॅड. सुशीबेन शहा, आमदार चित्रा वाघ, विशेष पाेलीस महानिरीक्षक प्रवीण पडवळ, महिला व बालविकास विभागाचे उपायु्नत राहुल माेरे, बाल ह्नक सरंक्षण, राष्ट्रीय महिला आंदाेलन अभ्यासक डाॅ.पाम रजपूत उपस्थित हाेते.महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी चाैथे महिला धाेरण जाहीर केले आहे. या धाेरणात महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आराेग्यविषयक उन्नतीसाठी विविध उपायांचा समावेश आहे. या धाेरणामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास डाॅ. गाेऱ्हे यांनी व्य्नत केला.महिलांमध्ये सक्षम नेतृत्व तयार करण्यासाठी लहानपणापासूनच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक शाळेत बालिका पंचायत सुरू करावी, जेणेकरून या माध्यमातून मुली आपले प्रश्न स्वत: साेडवणे त्यावर निर्णय घेण्याचे प्रशिक्षण या माध्यमातून मिळू शकणार आहे, असे बाेर्डीकर यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0