ऊर्जास्रोतांच्या विकासाबरोबरच वीजवितरण सुधारा

08 Feb 2025 14:15:44
 
ur
 
मुंबई, 7 फेब्रुवारी (आ.प्र.) :
 
राज्यात आगामी काळात नवीन ऊर्जास्रोतांचा विकास, ग्रीन एनर्जी प्रकल्प आणि वीजनिर्मितीत सुधारणांवर विशेष भर द्यावा, असे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. एचएसबीसी फोर्ट येथे आयोजित ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी, संचालक संजय मारुडकर, अभय हरणे, बाळासाहेब थिटे, कार्यकारी संचालक राजेश पाटील, पंकज नागदेवते, नितीन चांदुरकर उपस्थित होते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जाक्षेत्रात सुधारणा करण्याचे निर्देश बोर्डीकर यांनी दिले. राज्यात सौर आणि पवनऊर्जेचा अधिकाधिक वापर वाढवून प्रदूषणमुक्त ऊर्जानिर्मितीला गती द्यावी. शेती, उद्योग, व्यापार वापरासाठी वीज आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा मिळेल यावर विशेष भर देण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
Powered By Sangraha 9.0