भारतात प्रजननाचा दर कमी का हाेत आहे?

05 Feb 2025 23:29:40
 
 

birth 
 
वर्तमाचं चित्र: सर्वसमावेशक लाेकसंख्याशास्त्राचा 204 देशांमधून अभ्यास करून काढलेला एक निष्कर्ष, जगभरातून प्रजनन क्षमता सातत्याने कमी हाेत आहे व पुढेही कमी हाेत राहील. अनेक देशांच्या सरकारांनी जन्मदरात वाढ हाेण्यासाठी कितीही धाेरणे आखली, तरी याचा फारसा परिणाम, कमी हाेत जाणारा प्रजननाचा दर व लाेकसंख्या वाढीवर हाेईल, असे चित्र नाही.
 
भारताबद्दलबी निरीक्षणे : जी.बी.डी. या जागतिक संशाेधन संस्थेने भारताविषयी माहिती देताना 1950मध्ये असलेला प्रजनन 6.18 वरून 2021मध्ये 1.9 इतका घसरला असल्याचे नाेंदले आहे. या अभ्यासाने केलेल्या भाकिताप्रमाणे 21व्या शतकातहा दर 1.04 एवढा झाला असेल, सरासरी प्रत्येक महिलेस एक मूल असा या दराचा स्पष्ट अर्थ हाेताे. हा दर दक्षिणेतील राज्यांसाठी राजकीय तसेच सामाजिक व आर्थिक समस्याच हाेऊन बसला आहे. काही राज्यांना आपल्या कमी लाेकसंख्येचा परिणाम आपल्या लाेकसभेतल्या जागा गमावण्यावर हाेताे काय, ही भीती वाटू लागली आहे.
 
प्रजनन दर का कमी हाेताेय?
 
भारताकडे अनेक वर्षांपासून कुटुंब नियाेजनाचे कार्यक्रम आहेत.महिला साक्षरतेचा दरही कायम वाढता आहे, महिला सक्षमीकरण वेगात आहे तर महिलांच्या अपेक्षाही सतत वाढत आहेत. या सकारात्मक असलेल्या कारणांची दुसरी बाजू म्हणून प्रजनन दर सतत उतरत जाणे शक्य आहे. कुटुंबनियाेजनाचा हेतूच जर बदलला असेल तर प्रजनन दर उतरण्यास माेठे कारण ठरू शकताे. लग्न व मुलांना जन्म देणं यांच्याशी निगडित विचारांमध्ये पडलेला फरक व महिलांची बदललेली प्राधान्येही तितकीच महत्त्वपूर्ण आहेत.करिअर व आर्थिक स्वातंत्र्य या बाबी जर मातृत्वाच्या भावनांच्या वरचढ झाल्या तर प्रजनन कमी हाेत जाणार, यात शंकाच नाही. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणारे तरुण, तरुणी, तिथेच नाेकरी व्यवसाय करून स्थायिक हाेत असतील तर त्याचाही परिणाम निश्चित पणे लाेकसंख्येवर पडू शकताे.
 
परिणाम काय हाेतात? कमी हाेत जाणारा प्रजनन दर, दक्षिणेतील राज्यांमधून सतत स्थलांतर हाेत आहे. परिणामी, या राज्यांमध्ये वृद्धांची संख्या जास्त व त्यांची जबाबदारी घेणाऱ्या तरुणांची कमी, हा बदल हाेत आहे. ेरळसारख्या राज्यात वृद्धांना सेवा व सुरक्षा पुरवणारी तरुण पिढी कमी पडत आहे, त्यांचा भर उज्ज्वल भविष्यासाठी राज्याच्या बाहेर जाऊन स्थायिक हाेण्यावर आहे. केरळमध्ये सर्वाधिक साक्षरता, महिला सक्षमीकरण, सामाजिक आराेग्य क्षेत्रात प्रगती हाेऊनही राज्य मागे पडले आहे. तिथे म्हणाव्या तशा आर्थिक गुंतवणुकी व वाढ हाेऊ शकली नाही. तरुण मंडळी राज्य साेडून जाऊ लागली व मातृत्वसारख्या संकल्पना मागे पडू लागल्या. इच्छुक महिलांमध्ये वाढत्या वयामुळे मातृत्व अवघड हाेत गेले आणि गर्भधारणेतील अडचणी वाढू लागल्या.
 
आता केरळमध्ये बाहेरील राज्यातील विस्थापित रिकाम्या जागा भरण्यासाठी येत आहेत, ज्याचा प्रजननासाठी उपयाेग कमी आणि अडचणीच वाढत आहेत, असे तज्ज्ञ सांगतात. 2030 सालापर्यंत विस्थापितांची संख्या 60 लाख अपेक्षित आहे.प्रजननाचा मार्ग कधीच उलट दिशेने फिरत नसताे. दक्षिण काेरियासारख्या देशाने लाखाे विस्थापित व शरणागत स्वीकारूनही प्रजननाचा निर्देशांक एका वर्षात 0.78 वरून 0.73 इतका घसरला. लाेकसंख्या शास्त्राचे तज्ज्ञ सुचवतात त्यानुसार, प्रजननसंख्या वाढण्यासाठी तरुण वर्गाने त्या त्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे. जर सामाजिक आर्थिक धाेरणे अशी आखली, की त्या भागातली अर्थव्यवस्था सक्षम हाेईल, तरच तरुण वर्ग टिकेल.
Powered By Sangraha 9.0