काही वर्षांपूर्वी सीरियाच्या एका थडग्यात मातीच्या लांबट पट्ट्या मिळाल्या हाेत्या आणि आता विश्लेषणातून निष्कर्ष निघाला आहे की, त्यावर 4400 वर्षे जुन्या लिपीतील अक्षरे आहेत. कदाचित ही आत्तापर्यंतची ज्ञात सर्वांत प्राचीन लिपीतील अक्षरे आहेत.वास्तविक 2004 मध्ये अलेप्पाेजवळ उम्म अल-मर्रात झालेल्या उत्खननात 10 प्राचीन कबरींचा शाेध लागला हाेता. यापैकी एका कबरीतून प्रारंभिक कांस्ययुग(2600-2150 इसपू)तील मानवी अवशेष व इतर वस्तू निघाल्या हाेत्या. या वस्तूंमध्ये साेन्याचे दागिने, चांदीची भांडी, हस्तीदंताचा कंगवा, आणि मातीची भांडी इ. हाेते. साेबत चार मातीच्या पट्ट्याही हाेत्या. प्रत्येक पट्टी सुमारे एका बाेटाच्या आकाराची हाेती. एक सेंटीमीटर झाड व 4.7 सेंटीमीटर लांब आणि या लांबीत एक भाेकही हाेते. पट्ट्यांवर वेगवेगळी प्रतीक चिन्हे काेरलेली हाेती.
अलिकडील अध्ययनात जाॅन्स हाॅपकिन्स विद्यापीठाचे पुरातत्वशास्त्रज्ञ ग्लेन श्वार्टज यांनी या लिपींचे विश्लेषण करताना सांगितले की ही प्रतीके a, i, k. l, n, sआणि Y समान ध्वनींचे संकेत आहेत. पण संशाेधकांनी हे डिकाेड करण्यासाठी याची तुलना पाश्चात्य सेमिटिक भाषा (हिब्रू, अरामेकआणि अरबीचे प्राचीन आणि आधुनिक रूपामध्ये वापरल्या जाणाऱ्या अक्षरांशी केली.विश्लेषणावरून असे वाटते की, या लिपीत जी संकेताक्षरे काेरलेली आहेत ती एकतर व्यक्तींची नावे आहेत वा कबरीत पुरलेल्या वस्तूंची नावे आहेत. अमेरिकन साेसायटी ऑफ ओव्हरसीज रिसर्चच्या वार्षिक बैठकीत श्वार्टज यांनी सांगितले की, जर ही अक्षरे प्रतीक नावे वा वस्तूंची लेबल असतील तर हे समाजात वाढत्या शासकीय कामांसाठी लेखनाच्या गरजेकडे इशारा करते.
पट्ट्यांवर एकूण 11 प्रतीक दिसतात.
ज्यामध्ये काही प्रतीकांची पुनरावृत्तीही आहे. हे या गाेष्टीचा पुरावा आहे की ही प्रतीके एखाद्या लिपीतील अक्षरे आहेत.ना काेणत्याही शब्दासाठी चित्ररूपातीलनिरूपण. चार पट्ट्यांपैकी दाेन पट्ट्यांमध्ये एकच क्रम दिसून येताे. जाे त्यांच्या अखंडित टाेकांवर एकाच प्रतीकाक्षराने समाप्त हाेताे.श्वार्टज म्हणतात, प्रतीकांचा क्रम जेवढा लांब असेल. तेवढी जास्त श्नयता याची आहे की, ते चित्र निरूपणाऐवजी अक्षर प्रतीक असेल.तशी यातील दाेन अक्षरे इजिप्तच्या लिपीशी मिळतीजुळती आढळली आहेत.त्यामुळे असे प्रश्नही उभे राहतात की, पट्टीचे निर्माते इजिप्तच्या लिपीने प्रभावित हाेते. वा त्यांनी स्वतंत्रपणे आपली एक लिपी विकसित केली हाेती. आशा आहे की, भविष्यातील अध्ययन प्रतीकांचा अर्थ स्पष्ट करू शकेल व हा गुंता साेडवण्यास मदत करेल की पहिली लिपी केव्हा विकसित झाली हाेती.