समाेरच्याला निव्वळ प्रेमाने जिंकता येईल

    05-Feb-2025
Total Views |
 

Love 
 
मी स्वाती. माझं लग्न सात वर्षांपूर्वी अपेक्षा ठेवण्यापेक्षा एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. झालं आणि मी आहे बत्तीस वर्षांची.आधी आम्हा दाेघांमध्ये खूप प्रेम हाेतं, पण आता छाेट्या-छाेट्या गाेष्टींवरून भांडणं हाेतात. कळतंच नाही काय करू? असा काेणताही उपाय नाही का, ज्यामुळे आमच्यातील संबंध पूर्वीसारखे हाेतील. स्वाती मानसशास्त्रज्ञांसमाेर माेकळी हाेत हाेती. तेव्हा तिला मानसशास्त्रज्ञांनी सांगितलं...
 
 संबंधांमध्ये भिंती का निर्माण हाेतात? माझ्या कडे आलेल्या साेनियाचं उदाहरण मी तुला देते. साेनियाचं लव्हमॅरेज. दाेघांचं एकमेकांवर खूप प्रेम.दाेघं एकमेकांना चार-पाच वर्षे ओळखत हाेते. पण लग्न झाल्यानंतर साेनिया तिच्या पतीसाेबत चार-पाच महिनेही राहू शकली नाही. कारण तिच्या नणदांनी तिचं जगणं मुश्किल केले हाेते. बहिणींच्या सांगण्यावरून पती तिला मारायचा.
शेवटी या सगळ्याला कंटाळून ती माहेरी रहायला आली. एका अपघातात तिचे वडील आणि भाऊ चार वर्षांपूर्वी गेले.ती आता आई, दाेन वर्षांचा मुलगा यांच्याबराेबर माहेरी रहाते. माझा मुलगा अशा घाणेरड्या वातावरणात वाढावा असं मला अजिबात वाटत नाही. तिने घटस्ाेटासाठी अपील केलं आहे. संबंध ताेडणं साेपं नाही, हे मान्यच. पण जेव्हा ते निभावणं अवघड हाेतं, तेव्हा ते ताेडण्याशिवाय पर्याय नसताे.
 
 वेळेची कमतरता सध्याच्या काळात बहुतांश दांपत्य व्यस्त हायटेक जीवनशैली जगत आहेत.सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांचं काम सुरूच असतं. काही जर कितीतरी दिवस टूरवर असतात. ज्यामुळे त्यांना आपल्या जाेडीदाराला देण्यासाठी वेळच नसताे.आजकाल लाेक वैवाहिक आयुष्य केवळ वीकएंडला जगतात. यामध्ये जर एखादं मूल झलं तर त्याच्या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण हाेतात. मूल आईची की वडिलांची जबाबदारी असा बिकट प्रश्ननिर्माण हाेताे. परिणामी वेळेची कमतरता आणि वर्क लाेड यामुळे छाेट्या-छाेट्या गाेष्टींबाबत तक्रारी निर्माण हाेतात.मानसाेपचार तज्ज्ञांच्या मते, वैवाहिक संबंधांमध्ये ताणाची, विवादाची स्थिती निर्माण हाेण्याचे मुख्य कारण दाेघांच्या एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा न जुळणे. आपण इतरांकडून अपेक्षा ठेवताे, पण इतरांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करत नाही.