बदलांना सामाेरे जाण्यासाठी व्य्नितमत्त्व घडवण्याची गरज

05 Feb 2025 23:39:43


Health
एका नावाजलेल्या सरकारी बँकेत करिअर केल्यानंतर वयाच्या 52 व्या वर्षी जे. मल्लिकार्जुन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन इनसाॅल्व्हन्सी प्राेफेशनल म्हणजे दिवाळखाेरी प्रकरणातील तज्ज्ञ म्हणून व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. त्यांचा हा निर्णय अतिशय धाडसाचा हाेता. कारण त्या वेळी त्यांची मुलगी बारावीत व मुलगा नववीत शिकत हाेता. त्यामुळेच नाेकरी साेडणे मूर्खपणाचे ठरेल असे मत त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केले हाेते. मात्र पत्नीची सरकारी नाेकरी स्थिर स्वरूपाची असल्याने त्या बळावर त्यांनी पगारी नाेकर ते बिझनेस प्राेफेशनल असा प्रवास सुरू केला. त्याच वेळी मुंबईतील प्रसिद्ध अशा ग्रुमिंग वर्गाची त्यांनी स्वतःमध्ये अनेक बदल घडवून आणले. त्यातून मग त्यांना व्यावसायिक वाटचलीत आश्चर्यकारक रिझल्ट मिळू लागले.
आश्चर्यकारक बदल ते म्हणतात, मी आतापर्यंत नाेकरी केलेली असल्याने स्वतंत्रपणे ्नलायंटना कसे हाताळायचे हे शिकण्याची गरज हाेती, असे ते सुरुवातीच्या दिवसांविषयी सांगतात. मात्र, ग्रुमिंग वर्गातून ते त्यापेक्षा खूप काही गाेष्टी शिकले. अगदी कामाच्या ठिकाणी दालनात प्रवेश करताना कसे चालायचे, कशा प्रकारचे शर्ट घालायचे, बसल्यावर हात कुठे ठेवायचे अशा अनेक विषयावरील व्यावसायिक टिप्स आणि ट्र्निस त्यांना मिळाल्या. एवढेच नव्हे तर कार्यालयातील प्रसाधनगृहात गेल्यावर लघवीला कसे उभे राहायचे इथपासून ते शर्टवर घामाचे डाग दिसू नयेत म्हणून शरीरावरील केस काढून टाकण्याची गरज, आलिंगन कसे द्यायचे, कुणाच्या पाठीवर शाबासकीची थाप कशी आणि कितीवेळ द्यायची अशा अनेक गाेष्टी त्यांना समजल्या.
या काेर्सनंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात अनेक बदल झाल्याचे ते नमूद करतात. आधी ते रंगीबेरंगी शर्ट घालत असत. काेर्सनंतर ते लाईट कलरचे शर्ट घालू लागले. पूर्वी ते लांबलचक वा्नये माेठ्या आवाजात बाेलत असत. आता ते मृदू आवाजात आणि कमी शब्दात बाेलतात. त्यासाठी त्यांनी डाे्नयावर पुस्तके ठेवून ती पडणार नाहीत याची काळजी घेत व्हरांड्यातून चालण्यासारखे अनेक प्रयाेग केले. अगदी ्नलबमध्ये जेवण कसे करावे अशा अनेक बाबींतील बारीकसारीक गाेष्टींची माहिती त्यांना मिळत गेली व मग त्यातून मी जगायचे कसे हे शिकलाे, असे ते म्हणतात.असण्याबराेबर दिसणेही महत्त्वाचे सध्याच्या साेशल मीडियाच्या प्रभावाखालील जगात असण्याबराेबरच दिसणेही महत्त्वाचे ठरू लागले आहे.
त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची प्रतिमा उजव्या विचारसरणीचा बाहेरचा नेता ते आंतरराष्ट्रीय नेतृत्व अशी प्रतिमाघडवण्यासाठी अनेक कन्सल्टंटची मदत घेतली जात असल्याच्या अफवांपासून ते ओटीटीवरील मेड इन हेवन या मालिकेतील ताराची भूमिका करणाऱ्या शाेभिता धुलियापालाची प्रिन्सेस ग्रुमिंग स्कूलमधील शिकवणी आणि त्यातून मध्यमवर्गीय स्त्री ते अब्जाधीशाची पत्नी असा प्रवास म्हणजे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातली यशासाठी कुठल्याही टप्प्यावर जडणघडणीचे महत्त्व सांगणारी आहे.प्रशिक्षण संस्थांचे पीक जाेमात त्यामुळेच गेल्या काही वर्षांत अशा पद्धतीने व्यावसायिक आणि वैयक्तिक विकास, जडणघडण याबाबत मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांचे पीक आले आहे.
नवी दिल्लीतच अशा 4000 हून अधिक संस्था आहेत. त्यातील अनेक संस्था व्यक्तिमत्त्व विकासाबाबत व्यापक दृष्टिकाेनातून काम करतात.अगदी मेकअपपासून ते स्किन केअर, हेअरस्टाईल, काॅर्पाेरेट प्राेफेशनल्ससाठी इंग्रजी बाेलण्याचे वर्ग, देहबाेलीबाबतचे प्रशिक्षण अशा अनेक गाेष्टींचा त्यामध्ये समावेश असताे. मुंबईसारख्या महानगरांमध्ये अति उच्चभ्रू वर्गासाठी हायपर एलिट फिनिशिंग स्कूल्स आहेत.त्या ठिकाणच्या एकावेळच्या सल्लामसलतीसाठी 4 लाखांपासून ते 6 लाखांपर्यंत फी आकारली जाते. अशा संस्थांनी अभिनेत्री प्रियांका चाेप्रापासून ते लारा दत्तापर्यंत अनेकांना प्रशिक्षण दिलेले आहे. अशा संस्थांच्या दिवसभराच्या सेमिनारमध्ये सहभागी हाेण्याचे शुल्क प्रतिव्यक्ती 15 ते 20 हजार रुपये असते.
हे सगळे सध्याच्या इंग्लिश स्पीकिंग वर्गांमध्ये अधिक प्रकर्षाने दिसून येते. गुरुग्रामधील बहुराष्ट्रीय कंपनीत एचआर आणि मार्केटिंग प्राेफेशनल म्हणून काम करणाऱ्या के.दिव्यदत्ता यांनी इंग्लिश ट्रेनर म्हणून काम सुरू केले आहे.स्पाेकन इंग्लिशबराेबरच साॅफ्ट स्किल डेव्हलपमेंट तसेच नाेकरी मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक काैशल्यांचे प्रशिक्षण त्याठिकाणी दिले जाते.ते म्हणतात, आमच्याकडे कुणीही इंग्रजी बाेलायचे कसे हे शिकण्यासाठी येत नाही, तर इंग्रजी बाेलणे हा सवयीचा भाग व्हावा यासाठी येतात.त्यामुळेच इंग्रजी ही तुमची भावनिक भाषा व्हावी आणि त्या भाषेतून तुम्ही तुमच्या भावना व्यक्त कराव्यात अशा आमचा प्रयत्न असतामग वर्गात पहिल्या ब्रेकअपची गाेष्ट इंग्रजीतून सांगण्यापासून ते इंग्रजीतून गाॅसिंपिंग सेशन असे ए्नसरसाईज घेतले जातात. त्यातून मग काॅर्पाे रेट क्षेत्रात पहिल्यांदाच पाऊल ठेवणारे कामाच्या ठिकाणी सहजपणे रुळून जातात आणि तिथे त्यांना सहकारी, मित्र तयार करणे साेपे जाते.
Powered By Sangraha 9.0