झाेपेचे तास व्य्नतीनुसार बदलत असतात

04 Feb 2025 23:18:42
 
 

Sleep 
 
व्यक्तीची झाेप न झाल्यास आराेग्यावर परिणाम हाेऊ शकताे. त्यामुळे असंतुलन, अपचन, तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे राेग उदभवू शकतात. भारतात बहुसंख्य लाेकांना सहा ते सात तासांची झाेप मिळते, तर त्यांना आठ तासांची चांगली झाेप मिळावी लागते. झाेपेच्या अभावामुळे अनेक आजार हाेऊ शकतात. झाेपेची कमतरता शरीरात जळजळ आणि तणाव वाढवू शकते. झाेपेच्या तासांची संख्या प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. तज्ज्ञांनी प्राैढांसाठी रात्री सात ते नऊ तास झाेप आवश्यक असल्याचे सांगितले आहे. अमेरिकेमध्ये तर झाेपण्यासह नागरिकांना शांत शांत राहण्याचादेखील अधिकार आहे.आपली झाेप चांगली झाली तर आराेग्य चांगले राहण्यास मदत हाेते.
 
ज्यांना दिर्घकाळासाठी शांत झाेप येते त्यांच्यात काेणत्याही प्रकारच्या भितीचे प्रमाण जास्त असते तसेच हे लाेक लवकच चिडतात किंवा जास्त थकतात असेही काही अभ्यासांतून समाेर आले आहे. या लाेकांना जास्त कितीही झाेप झाली तरी ती पुरेशी वाटत नाही आणि दिवसभर झाेप येत राहते. त्यामुळे कमी वेळासाठी गाढ झाेप लागणे हे जास्त वेळ झाेपण्यापेक्षा जास्त आवश्यक असते. मात्र दिर्घकाळ झाेपणे हे आराेग्यासाठी चांगले नसते.अनेक जणांचा असा गरसमज असताे की झाेप ही निष्क्रिय अवस्थाआहे. झाेपेमध्ये मेंदू फक्त विशांती घेत असताे. शास्त्रीयदृष्टया असे आढळून आले आहे की, झाेपेमध्ये मेंदूचे काम चालू असतेच, किंबहुना झाेपेच्या एका विशिष्ट पातळीमध्ये मेंदू जागेपणापेक्षा दीडपटीने जास्त कार्यरत असताे!
 
झाेपेमध्ये मेंदूअगाेदर घडलेल्या घटनांचे विवेचन करीत असताे. स्मरणशक्ती दृढ हाेण्याकरिता याचा उपयाेग हाेताे.शांत व पुरेशी झाेप, साेबत समताेल आहार व व्यायाम ही निराेगी आयुष्याची त्रिसूत्री असली तरी आजच्या धावपळीच्या दैनंदिनीत शरीराला आवश्यक असलेली सहा ते आठ तासांची झाेप मिळत नाही.परिणामी 93 टक्के भारतीयांना अपुरी झाेप मिळते, असे तज्ज्ञ डाॅ्नटरांना अभ्यासाअंती आढळून आले आहे.िफटनेसच्या क्षेत्रातील एका ब्रँडने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की, जपानपाठाेपाठ भारत हा झाेप हिरावलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
 
अहवालात असे म्हटले आहे की, व्यक्तीला राेज रात्री सरासरी सात तास एक मिनिटाची झाेप मिळाली पाहिजे. जपानम ध्ये व्यक्तीला राेज रात्री फक्त सहा तास 47 मिनिटांची झाेप मिळते. केवळ भारतच नव्हे तर अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर या देशांमधील नागरिकांनाही सात तासांपेक्षा कमी झाेप मिळते. झाेपेतील रॅपिड आय मुव्हमेंटच्या (आरईएम) बाबतही भारत माग ेआहे. भारत आणि जपानमधील नागरिकांमध्ये हे प्रमाण सरासरी 77 आरईएम आहे.अहवालात असे म्हटले आहे की, 18-25 वयाेगटातील व्यक्ती सरासरी 12.33 पर्यंत झाेपी जातात तर 75-90 वयाेगटातील व्यक्ती 11.22 पर्यंत झाेपी जातात. आपल्याला पुरेशी झाेप मिळत नसल्याने आपण दिवसभर पुरेसे आणि पूर्ण क्षमतेने सक्रीय रहात नाही. या दाेन्ही बाबी निराेगी जीवनशैलीसाठी अतिशय आवश्यक आहेत.
Powered By Sangraha 9.0