यश मिळण्यासाठी अनेक गाेष्टींचा त्याग करावा लागताे

    03-Feb-2025
Total Views |
 
 

Picaso 
स्पेनमध्ये जन्मलेले पिकासाे हे एक महान चित्रकार हाेते. त्यांच्या कलाकृती जगभर काेट्यावधी रुपयांना विकल्या जात असत. एके दिवशी ते रस्त्यावरून चालत असताना एक महिला त्यांना ओळखते आणि त्यांच्याजवळ येऊन विचारते, सर मी तुमची खूप माेठी फॅन आहे. तुम्ही काढलेली चित्रे मला ार आवडतात. तुम्ही माझ्यासाठी एक पेन्टिग बनवून द्याल? पिकासाे हसले आणि म्हणाले, चित्र काढण्यासाठी आत्ता माझ्याकडे काहीच साहित्य नाही. नंतर कधी तरी तुमच्यासाठी पेन्टिंग बनवून देईन.ती महिला खूपच आग्रह करू लागली.आत्ताच पेन्टिंग बनवून द्या. परत तुमची भेट हाेईलच याची मला खात्री वाटत नाही.त्या महिलेचा आग्रह त्यांना माेडता येईना. मग त्यांनी खिशातून एक कागद काढला आणि पेनाने त्यावर काही काढू लागले. केवळ दहाच सेकंदात त्यांनी कामचलाऊ चित्र काढले. त्या महिलेला ते म्हणाले, हे पहा तुझ्यासाठी बनवलेले चित्र.
 
याची किंमत किती तरी लाख डाॅलर आहे.ती ते पेन्टिंग घेऊन घरी आली. तिला वाटले की, पिकासाे आपल्याला मूर्खात काढत आहेत. या पेंन्टिंगची किंमत लाखाे डाॅलर असणेच शक्य नाही. मग ती चित्रकलेतील तज्ञ व्यक्तींकडे गेली. चित्रांची खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटक़डे चाैकशी केली. सगळ्यांनी ते चित्र लाखाे डाॅलर किंमतीचे असल्याचे सांगितले. हे ऐकून तिला खराेखरच माेठे आश्चर्य वाटले. ती परत पिकासाेंकडे गेली आणि त्यांना म्हणाली, सर, तुम्ही म्हणत हाेता ते खरेच आहे. या पेन्टिंगची किंमत खराेखरच लाखाे डाॅलर आहे.त्यावर पिकासाे म्हणाले, ते तर मी आधीच सांगितले हाेते.ती म्हणाली, सर मला तुमची विद्यार्थीनी व्हायचे आहे आणि पेन्टिंग शिकायचे आहे.तुम्ही ज्याप्रमाणे दहा सेकंदात लाखाे डाॅलर किंमतीची पेंटिंग बनलली त्याप्रमाणे मला बनवता यावी असे मला वाटते.
 
पिकासाे हसले आणि म्हणाले, मी दहा सेकंदात जी पेन्टिंग बनवली ती शिकण्यासाठी मला 30 वर्षे लागली. तू देखील आयुष्यातील तीस वर्षे खर्च केलीस तर तुलाही अशी पेन्टिंग बनवता येतील.ती महिला अवाक हाेऊन त्यांच्याकडे पहात राहिली.मित्रांने जेव्हा आपण दुसऱ्याचे यश बघताे तेव्हा असे वाटते की, अरेच्च्या या व्यक्तीला तर खूपच लवकर आणि सहजपणे यश मिळाले आहे. पण त्या यशामागे किती वर्षांचे कष्ट आहेत हे जाणून घेण्याची कुणाचीही इच्छा नसते.यश तर मिळते पण त्यासाठी अनेक गाेष्टींचा त्याग करावा लागलेला असताे.यश मिळण्याच्या तयारीतच निम्मे आयुष्य खर्च करावे लागते. ज्या व्यक्ती स्वतः कष्ट करून, संघर्ष करून, चिकाटीने वाटचाल करत राहतात ते यशस्वी हाेतात आणि इतरांना वाटते की, त्यांना सहजपणे यश मिळालेले आहे.