ब्रेन ट्यूमर मेंदूच्या पेशींमध्ये वा स्नायू नलिकांमध्ये निर्माण हाेणारा असामान्य विकास असताे. भयानक डाेकेदुखी, उलटी व स्वत:ला संतुलित ठेवण्यास त्रास, हात-पाय बधिर हाेणे, मूडमध्ये बदल हाेणे इ.लक्षणे असून ती धाे्नयाची घंटा मानायला हवी.आपल्याला ट्यूमरच असेल असे नाही. त्याऐवजी दुसरा आजारही असू शकताे. पण ही सारी लक्षणे असल्यास ब्रेन ट्यूमरबाबत डाॅ्नटरांचा सल्ला घ्यायला वेळ लावू नये. शारीरिक परीक्षण, न्यूराेलाॅजिकल परीक्षण, सीटी स्कॅन, एंजियाेग्राफी, कवटीचा ए्नस रे, मायलाेग्राम, बायाॅप्सी इ.अशा पद्घती आहेत ज्यामुळे तपासणीनंतर ब्रेन ट्यूमर आहे की दुसरा आजार हे स्पष्टपणे सांगता येऊ शकते. ब्रेन ट्यूमर का हाेताे, याचे सटीक कारण अद्याप समजलेले नाही. तसा हा एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाकडे पसरणारा राेग नाही, परंतु असे जाेखमीचे कारक आहेत जे ब्रेन ट्यूमरमध्ये बदलू शकतात.सेलफाेनचा अत्यधिक वापर वा डाे्नयाचा मार याचे कारण हाेत नाही ना हेही पाहिले जात आहे.