मन एक शक्तिशाली यंत्र : मनात येणाऱ्या विचारामुळे एक तर भीती वाटते, तिरस्कार वाटताे वा प्रेम जडते. आपण या विचाराचा परिणाम आपल्या आराेग्य, नाते तसेच आपल्या काम व आर्थिक स्थिती अशा जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रकट हाेताना पाहू शकताे. कारण अवचेतन मन कधीही विचार नाकारू शकत नाही. एवढे की ज्यांचा आपण तिरस्कार करताे वा विराेध करताे तेही जेवढे ज्यांच्यावर आपण प्रेम करताे तेवढ्याच जाेशात समाेर येतील.मनाचा नियम आहे की ज्या गाेष्टींकडे आपण लक्ष देताे त्या आपल्या जीवनात मजबूत हाेत जातात. ज्याने माेठे यश मिळवले आहे अशा काेणालाही विचाराल तर ते हे सांगतील की आपल्या लक्ष्याविषयी त्यांचा उत्साही त्यांच्या जे हवे ते मिळेल की नाही याच्या संशय आणि चिंतेपेक्षा खूप जास्त हाेता.
वेळेची वाट पाहणे : आपली स्वप्ने कशी समाेर येतात यात काळ एक महत्त्वाची भूमिका बजावताे. कधी कधी जे हवे ते मिळवण्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागताे. पण हा उशीर अपयश नसताे तर एका माेठ्या याेजनेचा भाग असताे. प्रक्रियेवर विश्वास बाळगल्यामुळे याेग्य संधी जेव्हा यायची तेव्हा येईल हे माहीत असूनही आपण आपले लक्ष केंद्रित करू शकताे. ही पद्धत आपल्या काैशल्य व आकांक्षांसाठी उपयुक्त असते.
प्रयत्न करीत राहणे : सातत्य यशाची एक महत्त्वाची किल्ली आहे. आपण चलेले प्रत्येक छाेटे पाऊल आपल्याला आपल्या लक्ष्याच्या जवळ आणते. छाेटे प्रवास एकत्रित हाेत जातात व यशाचा एक स्थिर मार्ग तयार हाेताे. जर आपण आपल्याला अद्याप अपेक्षेप्रमाणे मिळालेले नाही व त्यात अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागताे आहे असे मानून हार मानाल तर आत्तापर्यर्ंत केलेल्या प्रयत्नांचा आनंद मिळवण्यास मुकाल. जे तत प्रयत्न करतात ते अखेरीस माेठे यश मिळवतात. जर आपण काही मनापासून मिळवू इच्छित असाल तर ताेपर्यंत प्रयत्न करीत राहायला मिळावले जाेपर्यंत ते आपल्याला मिळत नाही. हेच खऱ्या विश्वासू व्यक्तीचे लक्षण आहे. यासाठी आपल्या जीवाच्या वेळेवर विश्वास ठेवा आपले प्रयत्न सतत चालू ठेवा. आपली दृष्टी जिवंत ठेवा.