तरुणांना मार्गदर्शनासाठी देशातील प्रमुख शहरांत विवाहपूर्व सल्ला सेवा केंद्र हाेणार

30 Jan 2025 20:05:32
 
 


youth
 
 
देशात तरुणांमधील घटस्फाेटांच्या प्रमाणात माेठी वाढ झाली आहे. ही एक चिंतेची बाब असून, त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर हाेऊ लागला आहे. त्यामुळे तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी देशातील प्रमुख शहरांत विवाहपूर्व समुपदेशन (प्री मॅरेज काऊंसिलिंग) केंद्र उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महिला आयाेगाने घेतला आहे. या केंद्राचे लाेकार्पण येत्या 8 मार्च राेजी म्हणजे महिला दिनी केले जाणार आहे.सामाजिक दायित्व निधीच्या मदतीने महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी उत्तनच्या रामभाऊ म्हाळगी प्रबाेधिनीमध्ये राष्ट्रीय महिला आयाेग व म्हाळगी प्रबाेधनी संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने परिषदेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात देशभरातील प्रमुख खासगी संस्थेच्या प्रतिनिधींनी तसेच सामाजिकसंस्थांनी सहभाग घेतला हाेता.
 
या वेळी सामाजिक दायित्व निधीच्या मदतीने महिलांना सशक्त करण्याच्या हेतूने शिक्षण, संधी आणि आर्थिक सहकार्य देण्यासारख्या प्रमुख बाबींवर मंथन करण्यात आले. यात दायित्व निधीचा वापर कशाप्रकारे हाेऊ शकताे याबाबतचे मार्गदर्शन आयाेगाकडून देण्यात आले.या प्रसंगी बाेलत असताना देशात तरुणांमध्ये वाढते घटस्फाेटाचे प्रमाण ही एक चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.मात्र प्रगतीच्या मार्गावर धावत असलेले तरुण आता स्वतंत्र राहण्यास प्राधन्य देत आहेत. परिणामी या तरुण मंडळींना लग्नानंतर बदलणाऱ्या परिस्थितीला हाताळणे व त्यातून मार्ग काढणे कठीण हाेत आहे. यावर अभ्यास केला असता ही केवळ काैटुंबिक स्तरावरची समस्या नसून त्याचा व्यापक परिणाम इतर गाेष्टीवर देखील हाेऊ लागला आहे.
Powered By Sangraha 9.0