चर्चा किंवा वाद-विवाद करणे एक कला आहे. आणि जर ते याेग्य प्रकारेकेले गेले, तर त्यामुळे लाेकांचा दृष्टिकाेन बदलू शकताे.पण, नेहमी आपण युक्तिवाद करताना किंवा चर्चा करताना आपल्याच मतांना समाेर ठेवताे. ज्यामुळे समाेरची व्य्नती प्रभावित हाेत नाही.
स्टॅनफर्ड आणि टाेरंटाे युनिव्हर्सिटीच्या सामूहिक शाेधात आढळले आहे की, 74% उदारवादी आणि 70% रूढीवादी आपल्या मतांवर आधारित तर्कांमुळे दुसऱ्यांना प्रभावित करण्यात अयशस्वी हाेतात. केवळ 9% उदारवादी आणि 8% रूढीवादीच दुसऱ्यांच्या मूल्यांना लक्षात ठेवून चर्चा करतात आणि त्यांना आपल्या बाेलण्याने प्रभावित करण्यात यशस्वी हाेतात.युक्तिवादात कसे यशस्वी व्हावे? संशाेधनात हे समाेर आले आहे की, जर आपण काेणाला आपल्या बाेलण्याशी सहमत करू इच्छित असू, तर आपण त्यांची मूल्ये आणि विचारांना समजून घ्यायला पाहिजे.
युक्तिवाद करताना समाेरच्या व्य्नतीच्या मान्यतांना लक्षात ठेवणे सर्वांत महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण त्यांची मूल्ये जसे निष्ठा, स्वातंत्र्य किंवा समानता यांना समजून घेऊन म्हणणे मांडले, तर जास्त श्नयता असेल की, ते आपले म्हणणे समजून घेतील आणि स्वीकारतील. उदाहरणार्थ, रूढीवादी लाेक निष्ठा आणि अधिकार यांना, तर उदारवादी लाेक समानता आणि स्वतंत्रता यांना महत्त्व देतात.वादविवादाची रणनीती वाद घालताना किंवा युक्तिवाद करताना आधी हे समजून घ्या की, समाेरच्या व्य्नतीसाठी काेणती मूल्ये महत्त्वाची आहेत? आपल्या युक्तिवादात त्या मूल्यांना सामील करा, जी समाेरच्यासाठी महत्त्वाची असतील.
काेणत्याही चर्चेत समाेरच्याचा सन्मान कायम राखणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे म्हणणे गांभीर्याने ऐकले जाईल. अनेक वेळा तुमच्या आणि समाेरच्या व्य्नतीच्या मूल्यांमध्ये समानता असू शकते. त्या मुद्द्यांना आधार बनवून युक्तिवाद पुढे न्या. नेहमी युक्तिवाद करताना आपण ही गाेष्ट विसरताे की, समाेरच्या व्य्नतीचे विचारही बराेबर असू शकतात.चर्चा करताना हाेणारी सर्वांत माेठी चूक चर्चेत नेहमी लाेक ही चूक करतात की, ते आपल्याच मान्यतांना सर्वश्रेष्ठ मानतात.उदाहरणार्थ, उदारवादी लाेक समानता आणि स्वतंत्रता यांच्या आधारावर युक्तिवाद करतात.पण, जर समाेरची व्य्नती रूढीवादी असेल, तर ताे या युक्तिवादाला समजण्यात अयशस्वी हाेऊ शकताे.