शहरांमध्ये जागा कमीही असते आणि महागही; पण घरात बाग काेणाला नकाे असते. त्यासाठी टेरेस गार्डन उत्तम पर्याय आहे. गुलाब, ायकसश रातराणी टेरेस गार्डनवर असणे उत्तम विचार आहे; पण त्यात नियाेजन व शिस्तबद्ध साैंदर्य असावे. वास्तविक घराच्या आराखड्यापासूनच याची सुरुवात व्हायला हवी.घराचे ाउंडेशन बनवताना पुरेसे बीम व काॅलम बनवायला हवेत. जेणेकरून टेरेसचे जादा ओझे ते सहन करू शकतील. लाॅनमध्ये वाॅटर प्रूिफंग रुफची गरज असते. कारण गवताची ओल छतात येत असते.
तसेच त्यासाठी ज्याचे वजन टेरेस सहन करू शकेल असे मटेरियल वापरावे. टेरेसवर पाणी साचू नये यासाठी ड्रेनेज हाेल व स्लाेप असणे महत्त्वाचे असते. तज्ज्ञांच्या मते, विटांच्या चार इंच थराने वाॅटर ड्रेनेज बनवता येऊ शकते.बाजारात अनेक प्रकारचे गवत मिळते; पण लाॅनचे गवत मुख्यत्वे दाेन प्रकारचे असते.एक गरम वातावरणात उगवणारे बरमुदा गवत तर दुसरे गारवा हवा असणारे गवत. लाॅनसाठी बरमुदा वा शेड गवताला प्राधान्य द्यावे; पण जर सजावटीसाठी लाॅन हवे असेल तर मॅक्सिकन गवत आदर्श राहील. देखभाल कमी करावयाची असेल तर करब गवत लावावे.