साेलापूर हा बहुविध, बहुभाषिक असा महत्त्वपूर्ण जिल्हा आहे.येथील कापड उद्याेग क्षेत्र माेठे असून, पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर साेलापूर विद्यापीठाने पुढील काळात कापड उद्याेग क्षेत्राला साह्यभूत ठरणारे अभ्यासक्रम विकसित करावेत, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर विद्यापीठाच्या विसाव्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल बाेलत हाेते. यावेळी प्रा. ज्येष्ठराज जाेशी, कुलगुरू प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव याेगिनी घारे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, परीक्षा मंडळाचे सचिव श्रीकांत अंधारे यांच्यासह अन्य मान्यवर व विद्यार्थी उपस्थित हाेते. विद्यार्थ्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्यांच्या उत्पन्नात वाढ हाेईल यासाठी प्रयत्न करावेत. यातूनच देशाचे उत्पन्न वाढून सामर्थ्यशाली राष्ट्र घडण्यास मदत हाेणार असल्याचे प्रतिपादन प्रा. ज्येष्ठराज जाेशी यांनी केले.कुलगुरू डाॅ. महानवर यांनी विद्यापीठाच्या अहवालाचे वाचन केले. यावेळी विद्यापीठ परिसरात पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अहिल्यादेवींच्या जीवनावरील चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांनी केले. राज्यपालांच्या हस्ते विविध ज्ञान शाखांतील 15291 विद्यार्थ्यांना पदवी, 71 संशाेधक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी, तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले.