काॅमेंटरी काॅमेंटरीत फरक काय असताे!

12 Jan 2025 22:50:06
 
 

comedy 
एकेकाळी क्रिकेटची टीव्ही काॅमेंटरी फक्त इंग्लिशमध्ये व्हायची.भारतात क्रिकेटची लाेकप्रियता आणि बाजारपेठ समजल्यावर हिंदी काॅमेंटरी सुरू झाली. दाेन्हीकडची काॅमेंटरी ऐकताना फरक कळताेच.इंग्लिशमधली मंडळी सतत बाेलत नसतात. माेजकंच बाेलतात. तिथे शांतता असते. हिंदीतली काॅमेंटरी मात्र खूप लाइव्ह असते. तिथे काॅमेंटेटर पण बाेलत असताे, एक्स्पर्ट पण बाेलत असताे, गप्पा चालल्या आहेत, असं वाटतं. हे जे प्रेक्षकांना जाणवतं, तेच बराेबर आहे, हे संजय मांजरेकरने सांगितलं आहे. ताे स्वत: इंग्लिश काॅमेंटरी करताे. मॅचच्या ठिकाणी इंग्लिश काॅमेंटरीच्या बाॅक्सपासून थाेड्या अंतरावर, दुसऱ्या खाेलीत हिंदी काॅमेंटरी बाॅक्स असताे.
 
इंग्लिश काॅमेंटरी बाॅक्समध्ये एकदम परीटघडीचं वातावरण असतं. माेजकंच बाेलणं, खाेकला आला तरी बाजूला ताेंड करणं, कुणाला काही वेगळं बाेलायचं असेल, तर रूमच्या बाहेर जाणं, हे सगळं घडतं. इंग्लिश काॅमेंटरीमध्ये भावनांना कढ आणले जात नाही, शब्दवैभव सांडवलं जात नाही.हिंदी काॅमेंटरी बाॅक्समध्ये मात्र वेगळाच माहाैल असताे. नवजाेत सिद्धूसारखा समालाेचक असेल, तर ओ गुरू, हाे जा शुरू म्हणून शेराेशायरीपासून सुभाषितांपर्यंत अनेक गाेष्टींची पखरण सुरू असते.सिद्धू माेठमाेठ्याने हसत असताे. त्यामुळे संजयलाही आपलं काम संपलं की, आपल्या बाॅक्सऐवजी हिंदीवाल्यांकडे जाऊन तिथे रमायला आवडतं.
Powered By Sangraha 9.0