औषधांविना मिळवा वेदनांपासून आराम

    12-Jan-2025
Total Views |
 
 
 

Health 
 
जखम आणि स्नायूंच्या जुन्या दुखण्यातून बरे हाेण्यासाठी मसाज, हीटथेरपी, एक्सरसाइज, इलेकट्राेथेरपी यासारखे उपाय बऱ्याच वेळा औषधांपेक्षा माेलाचे ठरतात. हा फिजिओथेरपीचा एक भाग आहे, जाे आर्थाेपेडिकसच्या बराेबरीने न्यूराेलाॅजिकल समस्याही साेडवताे. मस्कुलाेस्केलेटल (स्नायूंशी संबंधित) प्राॅब्लेम्स, उदाहरणार्थ कंबरदुखी, मानदुखी किंवा सांधेदुखी या सर्व आजारांना मॅन्युअल थेरपी, एक्सरसाईज आणि ऑस्टिओपथी या सारख्या टेक्निक्सचा वापर करून वेदना मुळापासून थांबवल्या जातात.हे उपचार नैसर्गिक असतात आणि यांचे काेणत्याही प्रकारचे साइड इफेक्टही नसतात.विशेष करून आर्थाेपेड्निस किंवा न्यूराेसर्जरीनंतर फिजिओथेरपी रुग्णाला पुन्हा राेजच्या कामांसाठी याेग्य बनवते, ज्यात ट्रामा आणि जाॅईंट रिप्लेसमेंट, ब्रेनसर्जरींचाही समावेश आहे.
 
शरीराची सूचना आणि संचार प्रणालीवर उपाय : न्यूराे-फिजिओथेरपी मेंदू आणि सूचनाप्रणाली यांच्याशी संबंधित आजारांचे निदान करण्याची भूमिका बजावते.स्ट्राेक, पार्किसन्स राेग, मल्टिपल स्क्वेराेसिसच्या रुग्णांना ही थेरपी पुन्हा अ‍ॅक्टिव्ह करून संतुलन मिळवून देते.
 
महिला आणि मुलांचीसुध्दा हाेते थेरपी : गर्भधारणा झालेल्या आणि प्रसूतीनंतरच्या शारीरिक समस्यांवर उपचाराच्या दृष्टीने फिजिओथेरपी फायदेशीर असते. पेल्विक फ्लाेर एक्सरसाईज, प्रिनेंटल आणि पाेस्टनेटल थेरेपीने शारीरिक आव्हानांना संपुष्टात आणण्यात मदत मिळते. मुलांचे जन्मजात आजार, जसे सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्राफी, डाउन सिंड्राेम इत्यादींपासून ही मुक्ती देऊ शकते.यात व्यायाम, प्ले थेरपी आणि अप्प्लाईड बिहेव्हिअर अनॅलिसिसचा आधार घेतला जाताे.