विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासमवेत प्रशिक्षण महत्त्वाचे

10 Jan 2025 23:12:18
 
 

education 
 
शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञान आणि सैद्धांतिक माहिती प्रदान करते, तर प्रशिक्षण त्यांच्या काैशल्यांची आणि प्रत्यक्ष अनुभवाची जाेपासना करते. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी हाेण्यासाठी शिक्षणासाेबतच प्रशिक्षणही महत्त्वाचे असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी पाटील यांची येथे भेट घेतली. विविध राज्यांतील विद्यार्थी महाराष्ट्र आणि गाेवा दाैऱ्यावर आहेत. या विद्यार्थ्यांची पाटील यांनी विचारपूस केली. पंतप्रधानांनी 21 व्या शतकातल्या युवकांचे विचार, आशा आणि आकांक्षा लक्षात घेऊन नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धाेरण जाहीर केले आहे. त्यात आंतरशाखीय विषयांच्या अभ्यासावर भर, शिक्षणाची उपलब्धता, मातृभाषेत शिक्षण, जागतिक एकात्मतेवर भर यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे शिक्षण आणि प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रशिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाची व्यावहारिक उपयु्नतता शिकवते, जे पुढे जाऊन त्यांना नाेकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते, असे पाटील यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0