अमेरिकेतील सात राज्यांत ‘ट्री ऑफ 40 फ्रूट’ची 16 झाडं

    10-Jan-2025
Total Views |
 
 


Health
 
असे एक झाड आहे, ज्याला एक, दाेन नाही, तर तब्बल 40 प्रकारची फळं येतात. पृथ्वीवर अशी फक्त 16 झाडं आहेत. जाणून घेऊया या अनाेख्या झाडाविषयी. हे अनाेखे झाड ‘ट्री ऑफ 40 फ्रूट’ या नावाने ओळखले जाते. ट्री ऑफ 40 फ्रूट हे झाड कृषी क्षेत्रातील चमत्कार आहे.अमेरिकेतील सेराक्यूज युनिव्हर्सिटीमध्ये व्हिज्युअल आर्ट्सचे प्राध्यापक सॅम वाॅन ऐकेन हे या अनाेख्या झाडाचे जनक आहेत. या झाडाची संकल्पना खूपच अश्चर्यकारक आहे. या झाडाची किंमतही तशीच आहे. या एका झाडाची किंमत 19 लाख रुपये आहे. अमेरिकेतील सात राज्यांत ट्री ऑफ 40 फ्रूटची फक्त 16 झाडे आहेत.
 
प्राध्यापक सॅम वाॅन ऐकेन यांनी विज्ञानाच्या मदतीने या झाडीची निर्मिती केली आहे. न्यूयाॅर्कमधील एका कृषी प्रदर्शनाला भेटदिल्यानंतर त्यांना या झाडाची कल्पना सुचली.सन 2008पासून त्यांनी झाडाच्या निर्मितीच्या प्रयाेगाची तयारी सुरू केली.ग्राफ्टिंग टेक्निकच्या मदतीने त्यांनी ट्री ऑफ 40 हे अद्भुत झाड तयार केले.ग्राफ्टिंग टेक्निकच्या माध्यमातून झाड तयार करण्यासाठी हिवाळ्यात झाडाची एक फांदी कळीसाेबत ताेडली जाते. नंतर ही फांदी मुख्य झाडात कलम करून लावली जाते. अशा प्रकारे त्यांनी तब्बल 40 प्रकारच्या झाडांच्या फांद्या जाेडल्या आणि त्यांचा प्रयाेग यशस्वी झाला. ट्री ऑफ 40 फ्रूट या झाडाला बाेरे, चेरी, नेक्टराइन, खुबानी अशा फळांसह पेरू, ब्लॅकबेरी, केळी आणि सफरचंद देखील येतात.