यशासाठी प्रतिसादही महत्त्वाचा

    08-Sep-2024
Total Views |
 
 
 
 
success
शाळेत असताना आम्हाला हेलन केलर बद्दल एक धडा हाेता.प्रत्येक धड्याच्या शेवटी आम्हाला त्या धड्याशी संबंधित एक कार्य करावे लागायचे. हेलन केलरचा धडा जेव्हा संपला, तेव्हा आमच्या शिक्षकानी आमच्या वर्गातील सर्व मुलांना खेळाच्या मैदानावर नेले.
त्यांनी आम्हाला सांगितले की 10 मिनिटे सगळ्यांनी डाेळे बंद करून मैदानावर चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. आमच्यासाठी हे खेळासारखं हाेतं. 10 मिनिटांनंतर आमच्या शिक्षकाने आम्हाला डाेळे उघडायला सांगितले. त्यांनी आम्हाला सांगितले की हेलन केलरचं जग कसे हाेते, हे समजणे कठीण असले तरी आज आपण तिचे जीवन समजून घेण्यासाठी एक पाऊल उचलले. इतरांना समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव असणे महत्वाचे आहे. समाेरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी ऐकणे आणि प्रतिसाद देण्यासाठी ऐकणे यातील फरक समजून घ्या. प्रतिसाद देण्याची घाई करू नका.
 
कारण न जाणता जेव्हा तुम्ही प्रतिसाद देता त्यावेळी ताे चुकीचा असण्याची शक्यता असते. त्यामुळे समजून उमजून प्रतिसाद देणे गरजेचे असते.यातून अनेकदा मिळणारे यश दूर जाते. कारण यश मिळवायचे असेल तर अनेकदा सांघिक प्रयत्न गरजेचे असतात. किंवा अनेकदा दुसऱ्यांच्या कामगिरीवर तुमचे यश अवलंबून असते. अशा वेळी प्रतिसाद हा महत्वाचा ठरताे.त्याचप्रमाणे आपल्या पूर्वग्रहांबद्दल जाणून घ्यायला शिका. जेव्हा आपण आवाज ओळखण्यात सक्षम हाेताे तेव्हा आपण फक्त ऐकताे. पण आपण खरंच तेव्हा ऐकताे जेव्हा आपण त्याचा अर्थ काय आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करताे. यासाठी केवळ लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही, पण त्या शब्दांमागील अनुभव, हेतू आणि भावना यांना सामाेरे जाण्याची प्रतिबद्धता देखील आवश्यक आहे.समाेरच्याचे समजून घेणे, ताे काय सांगत आहे हे ऐकणे एखाद्यासाठी भीतीदायकही असू शकते. कारण कदाचित समाेरच्याच्या सांगण्यात आपण टाळत असलेल्या गाेष्टी आपल्याला अनपेक्षितपणे सापडतात.