महाराष्ट्राच्या विकासात डाॅ. पतंगराव कदम यांचे याेगदान माेलाचे ‘

    07-Sep-2024
Total Views |
 
 

Congress 
 
 
डाॅ. पतंगराव कदम यांनी शिक्षणासह विविध क्षेत्रांत उत्तम काम करून महाराष्ट्राच्या विकासासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. महाराष्ट्राच्या विकासाबराेबच काँग्रेसच्या विचारधारेबराेबर राहून त्यांनी पक्षाला ताकद दिली,’ असे गाैरवाेद्गार लाेकसभेतील विराेधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी काढले.राज्याचे ज्येष्ठ नेते, सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते व ताकारी टेंभूचे शिल्पकार, भारती विद्यापीठाचे कुलपती, माजी मंत्री डाॅ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व ‘लाेकतीर्थ’ या स्मारकाचे अनावरण खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते गुरुवारी (5 सप्टेंबर) डाॅ. पतंगराव कदम साेनहिरा सहकारी साखर कारखाना (माेहनराव कदम नगर, वांगी) येथे झाले. त्या वेळी गांधी बाेलहाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हाेते.
 
डाॅ. पतंगराव कदम साेनहिरा सहकारी साखर कारखाना, डाॅ. पतंगराव कदम प्रतिष्ठान व डाॅ. पतंगराव कदम स्मारक समिती यांच्या संयु्नत विद्यमाने कडेगाव (जि. सांगली) येथील भारती विद्यापीठ माताेश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयाच्या आवारात हा लाेकार्पण साेहळा झाला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील ग्रंथालयाला क्रांतिज्याेती सावित्रीबाई फुले; तर क्रीडागृहाला पुण्यलाेक अहिल्यादेवी हाेळकर यांचे नाव देण्यात आले असून, त्यांचे नामकरणही या प्रसंगी करण्यात आले.माजी केंद्रीय कृषी व संरक्षण मंत्री शरद पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगाेपाल, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक, विधिमंडळातील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थाेरात,
 
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटाेले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार डाॅ. विश्वजित कदम, माजी आमदार माेहनराव कदम, विजयमाला कदम, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डाॅ.शिवाजीराव कदम, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रम सावंत, स्वप्नाली विश्वजीत कदम, विराेधी पक्षनेते विजय वडेट्टिवार, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार विशाल पाटील मंचावरउपस्थित हाेते.विश्वजीत कदम यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘डाॅ. पतंगराव कदम यांनी शिक्षकी पेशातून आपल्या आयुष्याची सुरुवात केली. शिक्षक दिनाचे औचित्य साधून डाॅ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ आयाेजित करण्यात आला आहे. 60 वर्षांपासून कदम कुटुंबीय काँग्रेसशी जाेडले गेले आहे.कठीण परिस्थितीतही काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पाेहाेचविण्यासाठी डाॅ.पतंगराव कदम व माेहनराव कदम यांनी जिवाचे रान केले. दुष्काळी भागाचे डाॅ.कदम यांच्यामुळे अक्षरश: नंदनवन झाले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डाॅ.पतंगराव कदम यांनी माेलाचे काम केले.’ नाना पटाेले यांनीदेखील मनाेगत व्य्नत केले. विशाल पाटील यांनी आभार मानले.