विधी क्षेत्रातील महिलांच्या सहभागाने न्यायव्यवस्था सुदृढ

    04-Sep-2024
Total Views |
 
 
vi
 
छत्रपती संभाजीनगर, 2 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
विधी व न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतो आहे, ही सकारात्मक बाब असून भारतीय न्यायव्यवस्था अधिक सुदृढ व सक्षम असल्याचे ते द्योतक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करताना फडणवीस बोलत होते. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील, न्या. रवींद्र घुगे, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. ए. लक्ष्मीनाथ, कुलसचिव प्रा. धनाजी जाधव, खासदार डॉ. भागवत कराड; तसेच विधी व न्याय क्षेत्रातील विविध मान्यवर, न्यायमूर्ती, कायदेतज्ज्ञ व विधी विद्यापीठाचे अध्यापक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील तिन्ही विधी विद्यापीठे माझ्या कार्यकाळात स्थापन झाली व कार्यान्वितही झाली. या सर्व विधी विद्यापीठांच्या जडणघडणीत सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे योगदान आहे.