थायराॅइड ग्रंथीचे कार्य काय असते?

    23-Sep-2024
Total Views |
 
 

health 
 
थायराॅक्सिन आपल्या शरीरात हाेणाऱ्या बहुतांश जैव रासायनिक क्रियांना नियंत्रित करणारा एक प्रमुख हार्माेन आहे. जाे थायराॅइड ग्रंथीद्वारे स्त्रावित केला जाताे.त्याची महत्त्वाची कार्यं खालीलप्रमाणे...
 
 शारीरिक आणि मानसिक विकास (विशेषतः बालकांमध्ये)
 शरीरातील ऊर्जा उत्पादक क्रियांचा विकास करून कार्य करण्याची क्षमता, ऊर्जा आणि उत्साह वाढविणे
 पेशींना सुदृढ बनविणे
 मुलं आणि गर्भवती स्त्रियांमध्ये हा हार्माेन बालकाच्या मेंदूच्या विकासासाठी अति आवश्यक ठरताे आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये हा दुग्ध स्त्रावणास प्रेरित करताे.
 जनन कार्य आणि लैंगिक वृद्धी आणि विकासावरही या हार्माेनचा विशेष प्रभाव दिसून येताे.
 शरीराचे वजन नियंत्रित करण्यामध्ये या हार्माेनची भूमिका महत्त्वाची ठरते.
 
याच्या कमतरतेमुळे वजन वाढते किंवा खूप जास्त प्रमाणात कमी हाेते.हा हार्माेन शरीरात चरबीचा संचय किंवा रक्तातील काेलेस्ट्राॅलचे प्रमाण कमी करून हृदयराेगांपासून शरीराचे संरक्षण करताे.थायराॅक्सिन आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया म्हणजे भूक, तहान, झाेप, स्ूर्ती, उत्साह यांना नियंत्रित करते.
 
अनियमितता : थायराॅइड ग्रंथी याेग्य प्रकारे काम करत असेल तर व्यक्ती निराेगी राहते. रक्तामध्ये थायराॅक्सिनचा सामान्य स्तर साधारण 8 ग्रॅम/ डीएल असताे. रक्तामध्ये याची पातळी कमी किंवा जास्त हाेण्याने हार्माेनच्या कार्यात अनियमितता बघायला मिळते. ज्यास दाेन श्रेणीत विभागले जाते.