चिताेडगडमध्ये पाषाणयुगातील चित्रे अन् कलाकृती सापडल्या

23 Sep 2024 19:03:51
 


chitod
 
 
राजस्थानच्या चिताेडगड जिल्ह्यातील एका गावात पाषाणयुगातील काही चित्रे आणि दगडावर काेरलेल्या कलाकृती सापडल्या आहेत. मानवी विकासाचा हा सर्वांत पुरातन पुरावा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.जिल्ह्यातील रावतभाटा या गावाजवळील अमरपूरजवळच्या जंगलात गावातील तिघांना एका दगडावर काही चित्रे दिसली. हे ठिकाण आलनिया या नदीपासून 50 किलाेमीटर अंतरावर आहे. पाषाणयुगात हाडाैती आणि मध्य प्रदेशातील माळवा हे विभाग मानवी वसाहतींची प्रमुख केंद्रे हाेती. आता हे नवीन ठिकाण सापडले आहे.अमरपूरजवळ ही चित्रे सापडल्याचे समजल्यावर काेटा शहरातील महर्षी हिस्ट्री इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञ तेज सिंह हे त्यांच्या सहकाऱ्यांसह तेथे गेले.
 
या दगडावर कप आणि ऊखळाच्या आकाराची चित्रे त्यांना दिसली.त्या काळातील मानव या साधनांच्या साहायाने धान्य कुटत असल्याचा अंदाज आहे. या खुणा सुमारे 35 हजार वर्षांपूर्वीच्या असल्याचेही सांगितले जाते.ही चित्रे म्हणजे राजस्थानातील मानवी वसाहतीचा सर्वांत पुरातन पुरावा असल्याचे तेज सिंह यांनी सांगितले.त्या काळातील लाेक जंगली धान्य, फळे आणि शेंगा कुटण्यासाठी अशा ऊखळींचा वापर करत असावेत, असे ते म्हणाले. भारतीय पुरातत्त्व विभाग (एएसआय) या संदर्भात अधिक संशाेधन करणार आहे.
Powered By Sangraha 9.0