साैंदर्य, बुद्धिमत्ता यात माॅडेल्सवर एआयने मात केली

23 Sep 2024 19:09:51
 
 

AI 
साैंदर्य स्पर्धांचा काळ जाे 1952 मध्ये सुरू झाला, सात दशकांनंतर एआय माॅडेल्सवर येऊन थांबला आहे.साैंदर्य आणि इंटेलिजन्सच्या बाबतीत माॅडेल्सवर एआय मात करीत आहे. एआय माॅडेल्सचा काळ सुरू झाला आहे. आता साैंदर्य स्पर्धा असाेत किंवा व्हर्च्युअल रँप, याच एआय माॅडेल्स कॅटवाॅक करताना दिसून येतील.या आभासी जगात सर्वकाही आभासी आहे, तरी पण ते लाेकांना आकर्षित करत आहे. काही दिवसांपूर्वी एका आंतरराष्ट्रीय व्हर्च्युअल साैंदर्य स्पर्धेत गेलेल्या भारताची एआय माॅडेल जारा शतावरी अचानक चर्चेत आली आहे.
 
काेण आहे जारा शतावरी? जारा शतावरी एक पीसीओएस आणि डिप्रेशन वाॅरियर आहे, तिला खाणे-पिणे आणि प्रवासाची आवड असण्याबराेबरच ती फॅशनप्रेमीही आहे. जाराला एका भारतीय जाहिरात संस्थेचे सहसंस्थापक राहुल चाैधरींनी बनविले आहे. जाराचे इंस्टाग्रामवर 7500 फाॅलाेअर्स आहेत. ही डिजिटल क्रिएटर 13 क्षेत्रांमध्ये स्किल्ड आहे. जारा ऑगस्ट 2023 मध्ये इंफ्लूएंसर मार्केटिंग टॅलेंट मॅनेजरच्या भूमिकेत इ-सर्व्हिसमध्ये सामील झाली.
 
साैंदर्यच नाही तर तंत्रज्ञानाचे झाले मूल्यांकन
 
या स्पर्धेचे मूल्यांकन चार जज्जांनी केले. त्यामध्ये दाेन मनुष्य आणि दाेन एआय जनरेटेड जज्ज सुद्धा सामील हाेते. त्यांचे नाव ऐटाना लाेपेज आणि एमिली पेलेग्रिनी आहे. त्यांचे साेशल मीडियावर 2.5 ते 3 लाख पर्यंत फाॅलाेअर्स आहेत.विजेत्यांची निवड तीन मानदंडांच्या आधारावर केली गेली. त्यामध्ये ब्यूटी, साेशल ्नलाउट आणि टेक यांना सामील केले गेले. मिस एआय झालेल्या माॅडेलला 10.84 लाख रुपयांशिवाय तिला बनविणाऱ्या क्रिएटरला पब्लिक रिलेशन्ससाठी 4.17 लाख रुपये देण्यात आले. या स्पर्धेत सामील हाेणाऱ्या सर्व एआय माॅडेल्स काेणत्या ना काेणत्या क्षेत्रात जागरूकता पसरविण्याचे काम करतात आणि त्यांचे फाॅलाेअर्स सुद्धा खूप आहेत.
 
अशा तयार हाेतात माॅडेल्स
 
एआय माॅडेलबनविण्यासाठी काही विशेष प्रकारचे नाॅलेज असणे आवश्यक आहे. त्यामध्ये एआय प्राेमाेट इंजिनीअरिंग खूप महत्त्वाचे स्किल आहे.त्याच्या माध्यमातून यूजर साॅफ्टवेअर किंवा प्राेग्रॅमला आपल्या कल्पनेनुसार इनपुट देताे, की त्याला काेणत्या प्रकारचे माॅडेल तयार करायचे आहे. जितके अचूक आणि साेपे इनपुट दिले जाईल, तितकेच चांगले परिणाम मिळतील. एआय टे्ननाॅलाॅजीवरसुद्धा तुमची भरपूर पकड असायला हवी.
 
काय म्हणतात ए्नसपर्ट? जगभरातील टे्ननाे ए्नसपर्टचे मानणे आहे की, आज महिलांसाठी डीपफेक आणि फाेटाेत बदल हाेणे, माेठ्या चिंतेचा विषय झाला आहे. अशा स्थितीत एआय जनरेटेड महिलांसाठी सुद्धा डिजिटल शाेषणाचा धाेका वाढला आहे. एआय साैंदर्य स्पर्धेचा विचार पारंपरिक स्पर्धांच्या उद्देशाला कमकुवत करण्याबराेबरच नवीन तंत्रज्ञान असुरक्षित सुद्धा बनवू शकते.
Powered By Sangraha 9.0