यशस्वी हाेण्यापासून आपल्याला काेण राेखत आहे?

    21-Sep-2024
Total Views |
 

success 
 
ज्यादिवशी आपल्याला हे कळते आपण आपल्या जीवनाची जबाबदारी घेत प्रगतीच्या मार्गावर चालू लागताे. एका माेठ्या कंपनीची स्थिती खालावलेली हाेती. तिच्या उत्पादनांची विक्री कमी झाली हाेती आणि लाेकांचा विश्वास उडत चालला हाेता. कंपनीने स्थिती सुधारण्यासाठी एका प्रेरक गुरुची नेमणूक केली केली. वैयक्तिक मिटिंग घेऊन गुरुने सर्व कर्मचाऱ्यांना या नुकसानीचे कारण विचारले. सर्व कर्मचाऱ्यांनी एकमेकांवर आराेप केले आणि काेणीही जबाबदारी घेण्यास तयार नव्हते.दुसऱ्या दिवशी कर्मचारी लंच टाइमहून परतले तेव्हा त्यांना नाेटिस बाेर्डवर एक सूचना लावलेली दिसली. त्यात लिहिले हाेते, काल त्यांचा ताे सहकारी मेला जाे त्यांची प्रगती राेखत हाेता. कर्मचाऱ्यांना एका ठराविक वेळी त्याला श्रद्घांजली देण्यासाठी एका हाॅलमध्ये बाेलावण्यात आले.
 
सर्व कर्मचाऱ्यांना आपला साथीदार गेल्याचे दु:ख हाेते पण आपल्या प्रगतीत आडवा येणारा ताे काेण साथीदार आहे हे जाणण्यासाठी सारे उत्सुक हाेते. हाॅलमध्ये भिंतीसमाेर पडदा लावला हाेता. त्यावर लिहिले हाेते की, मृत व्यक्तीचा फाेटाे पडद्यामागे आहे. सर्वांनी एकेक करून पडद्यामागे जाऊन त्या व्यक्तीला श्रद्धांजली दिल्यानंतर प्रगतीच्या मार्गाने पावले टाकली. खरे तर जेव्हा एकेक करून कर्मचारी पडद्यामागे जात हाेता तेव्हा\चकीत हाेत हाेता. पडद्यामागे भिंतीवर फाेटाेऐवजी एक आरसा लावलेला हाेता. त्यावर एक चिठ्ठी लावली हाेती की जगातील फक्त एकच माणूस आपली प्रगती राेखू शकताे आणि ताे आपण स्वत: आहात. यामुळे आपण आपल्या नकारात्मक बाजूला श्रद्धांजली देऊन सकारात्मक जीवनात प्रवेश करावा. आरशात स्वत:चाच चेहरा पाहून अनेकांना हे सत्य जाणवले आणि त्यांचे डाेळे उघडले.
 
प्रामाणिकपणे एकदा स्वत:ला विचारून पहा की, आपल्याला कधी काेणी वर येण्यापासून राेखले हाेते का की कळतनकळत हा आपला निर्णय हाेता? आपल्याला काेणी सुदृढ जीवन जगण्यापासून राेखले हाेते का? आपल्याला काेणी परिश्रम करण्यापासून राेखले हाेते का? आपल्याला काेणी माेठ्यांचा आदर करण्यापासून अडवले हाेते का? आपल्याला काेणी नवे शिकण्यापासून अडवले हाेते का? आपल्याला काेणी इनाेव्हेशन करण्यापासून राेखले आहे का? काेणी आपल्याला चांगली पुस्तके वाचण्यापाून अडवले आहे का? जर आपल्या प्रगतीत वा यशात काेण सर्वांत माेठा अडसर आहेत तर आपण स्वत: आहाेत? अलीकडेच यूट्यूब व माेबाइलवर ‘याला हरवाल तर यश पक्के’ नावाचा एक व्हीडिओ आला हाेता.त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला हाेता.लाेकांना जाणीव झाली की आपल्याला यश देणारे आपणच आहाेत आणि अपयशाचे कारणही आपणच आहाेत.