कसे जगायचे, रडत की आनंदात; तुम्हीच ठरवा!

19 Sep 2024 18:42:02
 
 

Health 
 
आता स्वतःच्या आनंदासाठी विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारल्यामुळे सगळ्या समस्यांना एकट्यालाच ताेंड द्यावे लागते. अर्थात असे असले तरी संकटातून मार्ग निघताे. त्यासाठीचा संयम, प्रयत्नांची पराकाष्ठा या गुणांचा दाखला द्यावा लागताे. अशा वेळी कसे वागायचे हे आपणच ठरवायचे असते. जाॅब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जाॅब मिळेपर्यंत अनायसे सुट्टीच आहे तर मस्त फिरून येऊ म्हणणारे आणि अपेक्षित वेतनवाढ मिळाली नाही म्हणून काढून ठेवलेले विमानाचे तिकीट कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत..! जिभेच्या कॅन्सरमुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जाॅय करणारा आणि नकाे त्या गर्दीत नाटक बिटक , उगीच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे..!
 
बाल्कनीतून किती छान दिसतंय इंद्रधनुष्य म्हणून दाेन्ही काखेत ्नलचेस लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलाय यार फाेटाेत , त्यात काय बघायचं म्हणत लाेळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनरही बघितला आहे ..! फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमधे तेव्हाच थाेडे पैसे अजून टाकून फाेर बीएचके घेऊन टाकायला हवा हाेता म्हणून हळहळत बसणारे नवरा- बायकाेआणि एकाच खाेलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंबही बघायला मिळते.हे नकाे खायला असं हाेईल, ते नकाे प्यायला तसं हाेईल या टेंशनमधे ठराविक माेजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डाे्नयात ठेवणारे आणि जातील त्या ठिकाणी मिळेल ते झणझणीत चटपटीत बिनधास्त खाऊनही काही नाही हाेत यार म्हणत मजेत असणारे खवय्येही आजूबाजूला दिसतात.आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं; पण काही ते फुलवत जगतात, काही सुकवत जगतात..! आता त्याला काेण काय करणार..! आता कसे जगायचे हे तुमच्याच हातात असते. आनंदात जगायचे की रडत, तक्रारी करत जगायचे हे तुम्हीच ठरवा...
Powered By Sangraha 9.0