क्रीडा संकुलाची कामे गतीने पूर्ण करावीत : अजित पवार

19 Sep 2024 18:46:03
 
 

Pawar 
 
उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली.
क्रीडा संकुलात येणाऱ्या खेळाडूंना अधिकाधिक सुविधा मिळतील या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गतीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.पवार यांनी कन्हेरी वन विभाग, जळाेची उपबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती इमारत, फळे व भाजी हाताळणी केंद्र, मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय; तसेच क्रीडा संकुल नूतन इमारत, रेशीम काेष खरेदी-विक्री बाजारपेठ काेषाेत्तर प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्र, गरुडबागेतील कालवा सुशाेभीकरण आणि चिल्ड्रन पार्कमध्ये सुरू असलेल्या कामांची पाहणी करून संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली.
 
यावेळी उपवनसंरक्षक महादेव माेहिते, अपर पाेलीस अधीक्षक गणेशबिरादार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता अंकुश नाळे आदी उपस्थित हाेते. क्रीडा संकुलात मॅट फिनिशिंग असलेल्या फरशा बसवाव्यात.भिंतींच्या रंगानुसार कक्ष, कक्षातील साेफा, शाैचालय आदी बाबींचा विचार करून इलेक्ट्रिक उपकरणे वापरावीत. पुरेसा सूर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन कामे करा. विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण हाेतील याकडे लक्ष द्या. काेणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.
Powered By Sangraha 9.0