मन करते हृदयाच्या आराेग्यावर परिणाम

    19-Sep-2024
Total Views |
 
 
 

Mind 
इतर राेगांप्रमाणे, नैराश्य व अस्वस्थतेचा परिणाम हृदयासह संपूर्ण शरीरावर पडू शकताे. हा दुतर्फा संबंध आहे. नैराश्य हृदयाच्या राेगांची लक्षणांचे गांभीर्य वाढवते आणि हृदयराेगांशी झुंजत असलेल्या लाेकांमध्ये अस्वस्थता व नैराश्य वाढण्याची जाेखीम वाढते. नैराश्य व अस्वस्थतावाढल्यास तशीच लक्षणे समाेर येतात जशी हृदयाच्या समस्यांमध्ये असतात.उदा. धडधड वाढणे, अस्वस्थता, भूक न लागणे, थकवा इ. पॅनिक अ‍ॅटॅकच्या स्थितीत नेहमी अशी औषधेही दिली जातात जी हृदयाच्या समस्यांमध्ये दिली जातात.पर्सनॅलिटी सायकाेलाॅजी मानसशास्त्राची एक शाखा आहे. ही व्यक्तीच्या गुण व व्यवहाराशी संबंधित आहे. यात पर्सनॅलिटीला टाइप ए आणि टाइप बी मध्ये विभागतात.
 
स्पर्धा, महत्वाकांक्षी, अत्यंत व्यवस्थित, अधीर आणि शिस्तबद्ध लाेक टाइप ए मध्ये ठेवले जातात तर टाइप बी चे लाेक तुलनात्मक रुपात शांत, ऐषारामी, धैर्यवान व ताळमेळ राखणारे असतात. ही थेअरी दाेन कार्डियाेलाॅजिस्टद्वारा दिली गेली आहे. त्यांच्यामते टाइप-ए पर्सनॅलिटीवाल्यांमध्ये हृदयाशी संबंधित राेगांची जास्त श्नयता असते. तसा या थेअरीवर विचार विनिमय चालू आहे.नाती व हृदयाचे आराेग्य : हार्वर्ड विद्यापीठात 80 वर्षांच्या आकडेवारीच्या आधारे झालेल्या अध्ययनानुसार मजबूत नातीही आराेग्यावर परिणाम करतात. या अध्ययनाचे मार्गदर्शक राॅबर्ट वाल्डिंगर यांच्या मते, ‘आपल्या जवळच्या नात्यांची काळजी घेणे एकप्रकारे स्वत:ची काळजी घेणेच आहे. उत्तम नाती आपल्याला अकाली आजार हाेऊ देत नाहीत.
 
मन आणि हृदय दाेन्ही राहतील सुदृढ : मन आणि मेंदूत एक रुंद मार्ग आहे. जिथे भावना, आठवणी आणि अपेक्षांची ये-जा चालू असते. नैराश्य आणि अस्वस्थता अस्वस्थ जीवनशैलीची जाेखिम वाढवते, ज्यामुळे धूम्रपान, चुकीचे खाणे-पिणे आणि शारीरिक रुपाने असक्रिय राहण्याची शयता वाढते. हे हृदयराेग वाढवते.
 
= राेज कार्डियाे व्यायाम करा. (दर आठवड्याला 150 मिनिटे) ह्न राेज रेजिस्टेंस ट्रेनिंग करा. (दर आठवड्याला 75) ह्न ध्यान व दीर्घश्वासाचा अभ्यास करा.
= पुरेशी झाेप घ्या. संतुलित खा.
= लाेकांमध्ये मिसळा. गरज असेल तर काॅग्निटिव्ह बिहेवियर थेरपीसाठी जा