डबेवाल्यांचे घरांचे स्वप्न हाेणार साकार

17 Sep 2024 11:05:22
 
 
 

home 
मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजबांधवांसाठी 12 हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून डबेवाल्यांचे 60 वर्षांपासूनचे स्वप्न येत्या 3 वर्षांत साकार हाेणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.फडणवीस यांनी विधीमंडळ सभागृहात यासंदर्भातील आश्वासन दिले हाेते. त्याची पूर्तता यानिमित्ताने हाेणार आहे. प्रधानमंत्री आवास याेजनेत ही घरे बांधली जाणार असून, म्हाडाने यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पासाठी 30 एकर जागा प्रियांका हाेम्स रियालिटी देणार असून, नमन बिल्डर ङ्गना नफा ना ताेटाफ तत्वावर हे काम करणार आहे. यातून 12 हजार घरांची निर्मिती हाेणार असून, ती डबेवाले आणि चर्मकार समाजातील बांधवांसाठी उपलब्ध हाेणार आहेत.
 
प्रत्येकी 500 चाैरस फूट आकाराचे घर केवळ 25 लाखांत यामुळे दिले जाणार आहे. डब्बेवाला आणि चर्मकार बंधूंच्या स्वतःच्या घराचे स्वप्न येत्या 3 वर्षात पूर्ण हाेणार आहे.आपले डबेवाले जागतिक पातळीवर ख्यातीप्राप्त आहेत. वारकरी वारसा त्यांनी कधीही साेडलेला नाही. आपले तत्त्व आणि निष्ठा त्यांनी कधीही ढळू दिल्या नाहीत. म्हणूनच ते व्यवस्थापनातील अतिशय उत्कृष्ट माॅडेल आहेत. या घरांसाठी राज्य सरकारतर्फे सर्वताेपरी मदत करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या कार्यक्रमाला नमन बिल्डरचे जयेश शाह, प्रियांका हाेम्स रियालिटीचे रुद्रप्रताप त्रिपाठी, आमदार श्रीकांत भारतीय, डबेवाला संघटनेचे उल्हास मुके, चर्मकार निवारा असाेसिएशनचे अशाेक गायकवाड महाराज उपस्थित हाेते.
Powered By Sangraha 9.0