तणावामुळे संतुलन बिघडते तणाव अनेक समस्यांचे मूळ आहे. आपल्या शरीरात एक एड्रीनल नावाची ग्रंथी असते, जी तणावाशी लढण्यास मदत करते. पण सातत्याने राहणाऱ्या तणावामुळे या ग्रंथीच्या कार्यक्षमतेवर परिणाम हाेऊ लागताे आणि ही ग्रंथी तणावाला कमी करणाऱ्या हार्माेनची निर्मिती करू शकत नाही. म्हणूनच डाॅक्टर निराेगी राहण्यासाठी तणावाला दूर ठेवण्याचा सल्ला देतात. तणावाला दूर ठेवण्यासाठी सक्रीय जीवनशैली आजमावून बघा. नियमितपणे व्यायाम आणि याेगासनं करा. जर यामुळे तणाव कमी झाला नाही तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.हार्माेन्स बिघडविणारे ते दिवसतज्ज्ञ मानतात की, महिलांच्या शरीरात सगळ्यात जास्त हार्माेन्सचे असंतुलन सगळ्यात जास्त त्या दिवसात हाेते, जेव्हा प्रीमेंस्ट्रुअल सिंड्राेम जाणवताे. या दरम्यान शरीरात पाणी जमा हाेऊ लागते. त्याचबराेबर एंग्जाइटी, स्तनांमध्ये जडपणा, पाय किंवा शरीरास सूज इत्यादी समस्या जाणवतात.
मासिक पाळीच्या पूर्वी शरीरात हाेणाऱ्या हार्माेन असंतुलनापासून दूर राहण्यासाठी वजन नियंत्रित ठेवणे आणि नियमितपणे आठ तास झाेपणे गरजेचे आहे. त्याचबराेबर डाॅक्टरांच्या सल्ल्याने जीवनसत्त्व ब 12, जीवनसत्त्व ई आणि जीवनसत्त्व ड यांचं सेवन करणं ायदेशीर ठरते.गराेदरपणाचा परिणाम एका महिलेच्या शरीरत हार्माेनचे संतुलन सगळ्यात जास्त बिघडते ते गर्भावस्थेदरम्यान. हार्माे न्समध्ये हाेणाऱ्या बदलांमुळे गर्भावस्थेत काही विशिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा हाेते. मूड स्विंगमुळे कधी राग येताे तर कधी आनंद हाेताे. गराेदरपणाच्या काळात हार्माेन्सना संतुलित ठेवणे शक्य नसते. म्हणून गराेदरपणाच्या आधी आणि दरम्यान तसंच बाळाच्या जन्मानंतर आराेग्यदायी जीवनशैली आजमावायला हवी. गराेदरपणात आराेग्यदायी जीवनशैली आजमावून तुम्ही गराेदरपणानंतर हाेणाऱ्या पाेस्टपार्टम नैराश्याच्या धाेक्याला दूर ठेवू शकता.