चेंदा मेलम वादनाने केरळी कलाकारांनी केले‌ ‘श्रीमंत दगडूशेठ' गणपतीला अभिवादन

10 Sep 2024 14:03:26
 
 
da
 
पुणे, 9 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने उत्सवाच्या 132 व्या वर्षी उत्सव मंडपात केरळी वाद्य चेंदा मेलम वादनाने ‌‘दगडूशेठ' गणपतीला अभिवादन करण्यात आले. चेंदा हे कर्नाटकातील तुलुनाडू आणि तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. दरवर्षी या वाद्य वादनाने गणरायाला अभिवादन केले जाते. चेंदा हे केरळ राज्यात उगम पावणारे एक दंडगोलाकार पर्क्यूशन वाद्य आहे. तुळुनाडू (कोस्टल कर्नाटक) मध्ये हे चेंडे म्हणून ओळखले जाते. केरळ आणि तुळुनाडूमध्ये हे सांस्कृतिक घटक म्हणून देखील परिचित आहे. हे वाद्य केरळमध्ये 300 वर्षांहून अधिक काळ सर्वांत लोकप्रिय प्रकार म्हणून ओळखले जाते. असे हे वाद्य पाहण्याचा व वादन ऐकण्याचा आनंद पुणेकरांना या गणेशोत्सवात घेता आला.
Powered By Sangraha 9.0