त्वचा आणि आराेग्यासंबंधित त्रास दूर करताे अ‍ॅलाेव्हेरा

01 Sep 2024 22:44:00
 
 
 

health 
सामान्यत. लाेक आपल्या घरांमध्ये अ‍ॅलाेव्हेराचे राेप लावणे पसंत करतात पण याच्या आराेग्यासंबंधित गुणांविषयी बहुतेकांना माहिती नसल्यामुळे या राेपाचा हवा तसा वापर करू शकत नाहीत.अ‍ॅलाेव्हेरा राेपात सर्वांत महत्त्वाचा भाग त्याची पाने असतात ज्यामध्ये जेलसारखा पदार्थ आढळताे ज्याचा वपर तयाच रूपात वा ज्यूस बनवून केला जाताे.जर आपण आपले साैंदर्य उजळू इच्छित असाल तर अ‍ॅलाेव्हेरा जेलने आपण आपली त्वचा डाे्नयापासून पायापर्यंत उजळू शकता. तसेच हे जेल काेणत्याही त्वचेच्या प्रकारासाठी फायदेशीर मानले गेले आहे.
 
शरीराच्या याेग्य विकासासाठी एकवीस अ‍ॅमिनाे अ‍ॅसिडची गरज असते ज्यापैकी अठरा अ‍ॅलाेव्हेरात आढळतात. तसेच इतर पाेषक घटक म्हणजेच आयर्न, मॅगेनिज, कॅल्शियम आणि साेडियमही यात असते. श्नय असल्यास राेज अ‍ॅलाेव्हेरा ज्यूस घ्यावा.जर आपल्याला गॅसची समस्या असेल तर अ‍ॅलाेव्हेरा ज्यूसमध्ये लिंबाचा रस घेतल्यास ही दूर हाेईल. तसेच आपली पचनशक्तीही उत्तम हाेईल.बद्धकाेष्ठतेच्या समस्येत विशेषकरून अ‍ॅलाेव्हेरा ज्यूस प्याल्यास खूप आराम पडताे.आजकाल प्रदूषण खूपच वाढले आहे. अशावेळी मूल असाे वा माेठी माणेस सर्वांचीच राेगप्रतिकारक्षमता कमी हाेत चालली आहे. अशावेळी अ‍ॅलाेव्हेरा ज्यूस आपल्याला अ‍ॅ्निटव्ह राखताे. तसेच सर्दी-पडशाच्या समस्येपासून दूर ठेवताे.हा आपल्या हृदयाची काळजी घेत काेलेस्ट्राॅल वाढण्यापासून राेखताे.
 
ऑर्थरायटिस वा संधिवातात हाेणारी सांधेदुखी कमी करण्यासाठीही अ‍ॅलाेव्हेरा उपयुक्त आहे. यासठी आपण हवे तर अ‍ॅलाेव्हेराच्या पानांवर हळद लावून सरळ दुखऱ्या भागावर लावू शकता. वा राेज अ‍ॅलाेव्हेरा ज्यूसचे सेवन करू शकता.डायबिटीसच्या समस्येने पीडित वा ज्यांची सध्या पहिलीच स्टेज असेल त्यांनी अ‍ॅलाेव्हेराच्या ज्यूसमध्ये कारल्याचा रस मिसळून प्यावे.अ‍ॅलाेव्हेराचे जेल आपल्या स्किनसाठी अँटीएजिंग प्रमाणे काम करते. आणि रिंकल व फाइन लाइन्स कमी करते. पण सुरुवातीपासूनच हे लेल लावण्याची सवय लावली तर जास्त काळ आपण तरूण दिसू शकता.
Powered By Sangraha 9.0