काळ किती बदलला आहे

30 Aug 2024 23:02:27
 

eyes 
 
आपण कधी कधी काही छाेट्या छाेट्या बदलांकडे लक्ष देत नाही.कुणी दाखवून दिलं तर कळतं, आपल्या डाेळ्यांसमाेर घडलं हे, पण लक्षातच आलेलं नाही. इथली गंमत अनेकांना आता लक्षात येईल.जेव्हा टीव्ही नवीन नवीन आला हाेता, तेव्हा त्याच्या स्क्रीनला एक बाक असायचा. ताे पाहायला एका अंतरावर बसायला लागायचं.जवळून पाहिला तर चित्र विद्रूप दिसायचं. नंतर टीव्ही फ्लॅट स्क्रीन झाला, तेव्हा मुलं तर खूप जवळ जायची टीव्हीच्या. मग आईवडील ओरडायचे, अरे इतक्या जवळून टीव्ही बघशील तर डाेळ्यांच्या खाचा हाेतील. चष्मा लागेल, दूर राहा. तेव्हा वर्तमानपत्रांमध्ये लेख छापून यायचे.
 
त्यांच्यात माहिती दिलेली असायची की टीव्हीमधून अमुक प्रकारचे किरण बाहेर पडतात, त्यांनी अशा अशा प्रकारे नुकसान हाेतं. टीव्हीपासून किती अंतरावर बसणं याेग्य याच्या आकृत्याही काढलेल्या असायच्या. नंतर टीव्हीचं तंत्रज्ञान बदललं आणि आता जे एलईडी टीव्ही सगळ्यांच्या घरांत आहेत, ते डाेळ्यांसाठी इतके सेफ आहेत की ते तुम्ही अतिशय जवळून पाहू शकता. इथे व्हीआर हे साधन दाखवलेलं आहे. व्हीआर म्हणजे व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी. यात तुम्ही जाे काही कंटेंट पाहाल, ताे तुमच्या आसपासच घडताे आहे, असं वाटतं. ताे तर डाेळ्यांच्या किती जवळ आहे.
Powered By Sangraha 9.0