सुलभ प्रसूतीसाठी दवाखान्याची निवड कशी कराल?

30 Aug 2024 22:56:47
 
 
 
खालील गाेष्टींचं निरीक्षण करा आणि काही गाेष्टी पारखून घ्या...
 

delivery 
 
=सगळ्यात आधी दवाखान्याच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. तिथे स्वच्छतेकडे लक्ष दिले जाते की नाही, हे बघा. खाेलीतील संडास- बाथरूम किती स्वच्छ आहे, हे बघा. कारण घाण किटाणुंना जन्म देते. जे आई आणि बाळ दाेघांसाठी घातक ठरते.
 
=दुसरी गाेष्ट सुरक्षिततेची. म्हणजे दवाखान्यात काेण येते-जाते हे जाणून घ्या. जाताना प्रत्येक माणसाची तपासणे हाेते का, हे सुद्धा जाणून घ्या.
 
=डाॅक्टरांना देवासमान मानले जाते. म्हणून डाॅक्टरांशी बाेला. यामुळे डाॅक्टर किती आत्मियतेने सेवा करतात, याचा अंदाज तुम्हाला येईल.
 
=आई आणि बाळाची देखभाल नर्स करते, म्हणून नर्सविषयी जाणून घेणेही तितकेच आवश्यक आहे. तिची वागणूक, बाेलण्याची पद्धती, पाेशाक, कामाप्रती सजगता हे लक्षात घ्या. शिवाय नर्सला तुमची भाषा समजते का, हे पण जाणून घ्या. कारण नर्सकडून झालेला थाेडासा निष्काळजीपणा आई आणि बाळासाठी त्रासदायक ठरू शकताे.
 
=दवाखान्यातील वातावरण अवश्य बघा. म्हणजे पंखे आहेत की एसी, भिंती कशा आहेत, लाइट्सची व्यवस्था कशी आहे, हे जाणून घ्या.
 
=जर प्रसुतीदरम्यान काही समस्या निर्माण झाली तर त्यातून बाहेर पडण्यासाठी लेबर रूममध्ये कशी सुविधा आहे, याकडे लक्ष द्या.
 
=प्रसुतीसाठी येणारा खर्च, आवश्यक कागदपत्रं, बाळाच्या जन्माची रजिस्ट्रेशनची सुविधा, रूग्णाच्या खाण्याची व्यवस्था,नातेवाईकांना भेटण्याची वेळ, किती लाेक भेटायला येऊ शकतात, रात्री किती जण थांबू शकतात, त्यांच्या थांबण्याची व्यवस्था आणि गर्भधारणा ते प्रसुती असं काही पॅकेज आहे का, याविषयी पूर्ण माहिती अवश्य घ्या.
 
=जर र्नताची आवश्यकता भासली तर ती पूर्तता कशाप्रकारे केली जाईल, याविषयीही जाणून घ्या.
 
=औषधांच्या सुविधेसाठी केमिस्टचे दुकान दवाखान्याच्या आत आहे की बाहेर हे सुद्धा महत्त्वाचे ठरते. जेणेकरून वेळेवर सहज औषधं मिळतील.जर या छाेट्या-छाेट्या गाेष्टींकडे लक्ष दिलं तर याेग्य वेळी याेग्य दवाखान्याची निवड करण्यास समस्या येणार नाही. आणि तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या आनंदास एक संस्मरणीय क्षण बनवू शकता.
Powered By Sangraha 9.0