निराेगी जीवनशैली वापरून मधुमेहींनी स्ट्राेकची जाेखीम टाळणे गरजेचे

29 Aug 2024 23:27:43
 

Stroke
माणसाला हाेणाऱ्या गंभीर विकारांत मधुमेहाचा समावेश हाेताे. सध्या तरी या विकारावर परिणामकारक औषध उपलब्ध नसल्यामुळे ताे नियंत्रणात ठेवणे हाच उपाय आहे. भारतासह जगभरात याचे रुग्ण वाढत असून, भारत तर मधुमेहींची राजधानी हाेण्याची भीती व्यक्त केली जातेय. प्राैढांबराेबरच आता लहान मुलांमध्येही ताे आढळायला लागणे ही चिंताजनक बाब म्हणावी लागेल.या विकाराचे परिणाम अनेक अवयवांवर हाेतात. यकृत आणि मूत्रपिंडे बिघडणे हा त्यातील एक. साेबतच या रुग्णांना पक्षाघाताची, म्हणजे स्ट्राेकचीही भीती असते.
एखाद्या व्यक्तीचे वडील किंवा भाऊ यांना स्ट्राेक बसल्याची चर्चा तुम्ही ऐकली असेल.त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असला, तरी ते हिंडते-फिरते हाेते. मात्र, स्ट्राेकमुळे त्यांचे फिरणे बंद झाले आहे, त्यांचा एक हात अथवा पाय दुर्बल झाला असून, थरथर वाढली आहे.त्यांना काेणाच्या तरी आधाराशिवाय चालता येत नाही वगैरे माहिती आपण ऐकत असताे. स्ट्राेक बसलेल्या काहींचा स्वभाव नंतर रागीट हाेताे, तर काहींची स्मरणशक्ती कमजाेर हाेते.संबंधित व्यक्तीच्या हालचालींवर स्ट्राेकमुळे निर्बंध येतात.याचाच अर्थ, स्ट्राेक बसणेही गंभीर असून, त्यासाठी सावध राहायला हवे. आराेग्यदायी जीवनशैली स्वीकारून ही जाेखीम कमीत कमी करता येऊ शकते.
स्ट्राेक म्हणजे काय? अचानक येणारी बेशुद्धी म्हणजे स्ट्राेक, असे सर्वसाधारणपणाने सांगता येते. त्याचा धक्का बसलेली व्यक्ती शुद्धीवर येते; पण हात किंवा पायांना स्ट्राेकचा फटका बसताे. पूर्वी हा विकार ज्येष्ठांना हाेत हाेता.पण, आता मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणामुळे कमी वयाच्या लाेकांनाही स्ट्राेक बसायला लागला आहे.सध्याच्या काळात 50 वर्षे वयाच्या मधुमेही रुग्णांमध्ये ही श्नयता जास्त दिसते. मधुमेही रुग्णांच्या शरीरातील ‘कॅराेटिड शिरां’मध्ये (carotid vein) चरबी किंवा मेद जमा हाेत राहिल्यामुळे शुद्ध रक्ताच्या वहनात अडथळे येऊन स्ट्राेक बसताे.
‘टीआयए’ म्हणजे काय? आपल्या डाॅ्नटरांबराेबर बाेलताना तुम्ही ‘टीआयए’ हे लघुरूप ऐकले असेल. ‘ट्रान्सेंट इस्चिमिक अ‍ॅटॅक’ (transient ischemic attack-TIA) असा ताे पूर्ण शब्द असून, लहान अथवा छाेटा स्ट्राेक असा त्याचा अर्थ आहे.‘टीआयए’मुळे काही काळ बेशुद्धी आणि कमजाेरी येते असली, तरी त्याचा परिणाम 24 तासांपेक्षा जास्त वेळ टिकत नाही आणि ‘टीआयए’चा रुग्ण पुन्हा नेहमीसारखा हाेताे. मात्र, ‘टीआयए’ग्रस्तांतील एक तृतीआंश रुग्ण पाच वर्षांत माेठ्या अथवा जीवघेण्या स्ट्राेकची शिकार हाेतात.त्यामुळे ‘टीआयए’चा विकार असलेल्यांनी रक्तवाहिन्यांच्या विकारांबाबतच्या सर्जनचा (vascular surgeon)अथवा न्यूराेलाॅजिस्टचा सल्ला घ्यावा.
चरबी हे स्ट्राेकचे मुख्य कारण मानेतील धमन्यांमध्ये (arteries) साठलेली चरबी आणि कॅल्शियम साठल्यामुळे स्ट्राेक बसत असल्याचे सुमारे 90 टक्के रुग्णांमध्ये आढळले आहे. याला वैद्यकीय परिभाषेत ‘एथेराेस््नलेराेसिस’ (atherosclerosis) असे म्हणतात. धमन्यांत चरबी आणि कॅल्शियम साठल्यामुळे मेंदूकडे जाणाऱ्या शुद्ध रक्ताचे प्रमाण कमी हाेते आणि चरबीचे कण मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन त्या बंद हाेऊ लागतात. हे कण मेंदूच्या काही भागांची कायमस्वरूपी हानीही करतात. हृदयाच्या एखाद्या काेपऱ्यात पडलेला रक्ताचा थेंबही नुकसान करताे. याचे कण मानेतील धमन्यांतून मेंदूमध्ये जाऊन तेथील रक्तवाहिन्या बंद करतात व त्यामुळेही स्ट्राेक बसताे.
‘कॅराेटिड शिरे’मुळे स्ट्राेक मान आणि मेंदूतील सर्व रक्तवाहिन्या स्ट्राेकला कारणीभूत असल्या, तरी मानेत असलेल्या आणि शुद्ध रक्त नेणाऱ्या धमन्या स्ट्राेकच्या दाेन तृतीआंश घटनांना जबाबदार असतात. ‘कॅराेटिड’ ही वाहिनी शुद्ध रक्त वाहून नेते आणि तीच स्ट्राेकला मुख्यत्वे कारणीभूत ठरते. ती स्वच्छ आणि चरबीरहित राहिली, तर 80 टक्के रुग्णांमधील स्ट्राेकची जाेखीम कमी हाेते. ‘कॅराेटिड’ ही हृदयापासून निघणारी मुख्य रक्तवाहिनी असून, ती मेंदूला शुद्ध रक्ताचा पुरवठा करते. ही वाहिनी मानेच्या दाेन्ही बाजूंना असते. तिची एक शाखा चेहरा आणि मानेच्या भागांना रक्तपुरवठा करते आणि‘आंतरिक कॅराेटिड’ म्हणून ओळखली जाणारी वाहिनी मेंदूला रक्तपुरवठा करते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0