तुम्ही ‘टाॅ्निसक पार्टनर’ आहात का, हे तपासून पाहा

    29-Aug-2024
Total Views |
 
 

Partner 
 
 
काेणतेही नाते जाेपासण्यासाठी परस्पर विश्वास आणि साैहार्द असावे लागते. पण, काहींना ते जमत नाही.संशयी स्वभावामुळे नातेसंबंध तुटण्याच्या पातळीवर पाेहाेचतात. याचा उल्लेख ‘टाॅ्निसक रिलेशनशिप’ म्हणजे, विषारी नातेसंबंध असा केला जाताे. कटुता असा त्याचा अर्थ. आपला जाेडीदार असा असल्याचा अनुभव काहींना येताे.पण, काही वेळा स्थिती उलट असते.जाेडीदार नव्हे, आपणच तसे असताे.मात्र, याची जाणीव फार कमी लाेकांना असते. तुम्ही तसे आहात का, हे तपासा तसेच त्याची लक्षणे जाणून घ्या.
 
 आपल्या जाेडीदारावर क्षुल्लक कारणांनी किंवा कारण नसतानाही रागावणे. यात काही वेळा तुम्ही इतर काेणावरील राग जाेडीदारावर काढत असता.
 
 रागाच्या भरात तुम्ही मर्यादा ओलांडून जाेडीदाराला दुखावता आणि नंतर प्रेमाच्या नावाखाली त्याचे समर्थन करता का? तसे असेल, तर तुम्ही टाॅ्निसक आहात हे समजून घ्या.
 
 आपल्या चुकांची जबाबदारी न घेता त्याचे खापर जाेडीदारावर फाेडता का? तसे असेल, तर तुमच्या स्वभावात सुधारणा करण्याची गरज आहे.
 
 आपल्या जाेडीदाराबाबत सतत शंका घेऊन प्रश्न विचारणेसुद्धा चूक असते. त्यातून तुमची असुरक्षितता उघड हाेते आणि तुम्ही टाॅ्निसक जाेडीदार असल्याचे दिसते.
 
 तुमच्या जाेडीदाराबराेबर खाेटे बाेलणे तसेच स्वार्थी असणे म्हणजेसुद्धा टाॅ्निसक जाेडीदाराचे लक्षण असते.
 
 तुमच्या नातेसंबंधांत काेणत्याही तडजाेडीची तयार नसणेसुद्धा धाेकादायक असते. तुम्ही मात्र जाेडीदाराकडून तशी अपेक्षा करता.
तसे असेल, तर तुमचे नाते स्नेहाचे राहत नाही.परस्परांचा सन्मान आणि वैचारिक स्वातंत्र्य हा काेणत्याही नात्याचा पाया असताे, हे लक्षात ठेवा आणि स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला सहजीवनाचा आनंद घेता येईल.