ऑस्टिओ आर्थराइटिसपासून मु्नती कशी मिळवाल?

    29-Aug-2024
Total Views |
 
 
 
 
Arthritis
आर्थराइटिस अनेक प्रकारचे असतात.ज्यामध्ये मुख्य आहेत- ऑस्टिओ, रूमेटाॅइड, गाऊटी आणि जुनेनाइल आर्थराइटिस. सगळ्यात सामान्य आहे, ऑस्टिओ आर्थराइटिस. या आजाराची लक्षणं आणि उपचार याविषयी...
 
ऑस्टिओ आर्थराइटिसमध्ये शरीराचं वजन सहन करणारे सांधे विशेषतः गुडघ्यांवर परिणाम झालेला दिसताे. यामुळे पायात तिरकेपणा आलेला जाणवताे. त्यांच्यामधील अंतरही वाढलेले दिसते. रूग्ण लंगडत लंगडत चालताे. सांध्यांमध्ये वेदना, कडकपणा येताे, सांधे विकृत हाेतात, त्वचा लाल पडू लागते, कार्टिलेजमध्ये आवाज येताे. चालण्या-िफरण्यास समस्या जाणवते.ही या आजाराची सामान्य लक्षणं आहेत. जर तुम्हालाही ही लक्षणं जाणवत असतील तर त्वरीत डाॅक्टरांकडून निदान करून घ्या.उपचार याचा सर्वांत परिणामकारक उपचार म्हणजे जाॅइन्ट रिप्लेसमेंट सर्जरी. प्रत्येक वर्षी साधारण अडीज लाख लाेक जगभरात आणि साधारण पंचवीस लाख लाेक भारतात गुडघा रिप्लेसमेंट करतात.
 
डाॅक्टरांच्या मते, आजही आपल्या देशात बहुतांश लाेक या आजारासाठी मसाज, अ‍ॅक्युप्रेशर, घरगुती उपचार यावर भर देतात. पण हे सगळे उपाय काही काळासाठीच ायदेशीर ठरतात. त्यांना हे माहित नाही की, नी रिप्लेसमेंटमुळे जीवन अधिक सुखद हाेईल. तसंच यामुळे शरीराचे इतर सांधेही ठिक हाेतील.लाेकांमध्ये असा गैरसमज आहे की, जाॅइन्ट रिप्लेसमेंट सर्जरी आयुष्यभर या आजारापासून मुक्ती देणार नाही. या कारणामुळे ते शस्त्रक्रियेपासून दूरच राहतात. सत्य हे आहे की, एक चांगली रिप्लेसमेंट सर्जरी कमीत कमी पंचवीस ते तीस वर्षांसाठी सहाय्यक ठरते. यामुळे त्यांना केवळ वेदना, सूज आणि आखडलेपणा यापासून आराम मिळताे असं नाही तर ते पुन्हा सामान्य आणि सक्रिय आयुष्य जगू शकतात.
 
तज्ज्ञांची मदत तुमच्या फॅमिली डाॅक्टरांशिवाय तुम्ही या हेल्थ केअर प्राेेशनल्सची मदत घेऊ शकता- िफजिकल थेरपिस्ट, ऑक्युपेशन थेरपिस्ट, डायटिशियन, सायकियाट्रिट, सायकाेलाॅजिस्ट, नर्स आणि साेशल वर्कर इतर उपाय : जाॅइंट प्राेटेक्शन या कष्टकारी आजारानंतर तुम्ही एक संपूर्ण आणि सक्रिय आयुष्य जगू शकता. त्यासाठी व्यायाम आणि डाॅक्टरांच्या उपचारांनंतर जाॅइन्ट प्राेटेक्शनचे उपाय आजमावू शकता. ह्न वस्तू उचलण्यासाठी माेठ्या सांध्यांचा वापर करा. छाेटे, कमजाेर सांधे यांच्यावर जास्त वजन टाकू नका. म्हणजे शाॅपिंग बॅग्स उचलण्यासाठी हाताच्या पुढील भागाचा किंवा तळव्याचा वापर करा.