तरुणाईसाठी मानसिक आराेग्य ही चिंता नसून संकट

    28-Aug-2024
Total Views |

 

young
 
आराेग्य ही सर्वांत माेठी संपत्ती असते आणि त्यात केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आराेग्याचाही संबंध येताे. आपण बहुतेक सगळे शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष देताे आणि मनाच्या आराेग्याकडे मात्र दुर्लक्ष करताे. नंतर मनाेविकारांच्या रूपाने त्याचे परिणाम सहन करावे लागतात. सध्याची तरुण पिढी त्याला सामाेरी जात असल्याचे दिसते. या पिढीसाठी मानसिक आराेग्य ही चिंता उरली नसून, संकट झाले आहे. काेणत्या ना काेणत्या मनाेविकारामुळे रुग्णालयात दाखल हाेऊन उपचार घेण्याच्या प्रमाणात गेल्या तीन-चार वर्षांत 30 टक्के वाढ झाल्याचे एका आकडेवारीतून समाेर आले आहे.यात तरुणांचे प्रमाण जास्त असणे धक्कादायक आहे. ‘पूर्वीच्या तुलनेत अशा केसेसमध्ये 20-30 टक्के वाढ झाली आहे,’ अशी माहिती नवी मुंबईतील अपाेलाे हाॅस्पिटलमधील सल्लागारमानसाेपचारतज्ज्ञ डाॅ. ऋतुपर्ण घाेष यांनी दिली.
मुंबईतील काेकिळाबेन धीरूभाई अंबानी हाॅस्पिटलमध्ये दाखल हाेणाऱ्या अशा तरुणांचे प्रमाण काेराेना महामारीनंतर 20-25 टक्के वाढल्याचे सल्लागार मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. शाैनक अज्निंय यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘नैराश्य आणि औदासीन्यासारख्या मूड डिसऑर्डर विकारांचे प्रमाण 10 ट्न्नयांवरून 30 ट्न्नयांवर गेले आहे, तर अँ्नझाइटी डिसऑर्डरचे प्रमाण 15 ट्न्नयांवरून 31 ट्न्नयांवर गेले आहे. झाेपेबाबतच्या तक्रारी अथवा विकारांचे (स्लीप डिसऑर्डर) प्रमाण 15 ट्न्नयांवरून 37 ट्न्नयांवर पाेहाेचले आहे.’ मानसिक विकारांच्या आपत्कालीन स्थितीमुळे रुग्णालयात यावे लागणाऱ्यांमध्ये तरुण वर्गाचे प्रमाण जास्त असल्याचे कडबाम्स हाॅस्पिटलने केलेल्या एका अभ्यासात आढळले आहे. हे हाॅस्पिटल बंगळुरूमध्ये असून, ते मानसाेपचारांसाठी प्रसिद्ध आहे.
येथे येणाऱ्या रुग्णांमध्ये 30-40 वर्षे वयाेगटांतील तरुणांचे प्रमाण सर्वांत जास्त असून, त्यांची टक्केवारी 34.6 असल्याचे दिसते. 20-30 वर्षे वयाेगटांतील तरुणांमध्ये हे प्रमाण 28.8 टक्के आहे. 20 ते 60 वर्षे वयाेगटांतील लाेकांचा सात महिने अभ्यास करून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. सुनील एम. आर. हे म्हणाले, ‘तरुणाईतील वाढता मनाेविकार ही चिंतेची बाब आहे.काम आणि व्य्नितगत आयुष्याच्या संतुलनाचा दबाव, आर्थिक अस्थैर्याची भीती आणि सामाजिक अपेक्षांच्या ओझ्यामुळे या पिढीमध्ये मानसिक तणाव वाढत आहेत. त्यात प्राेफेशनल्सचे प्रमाण जास्त आहे. विकारांचे वेळेवर निदान हाेऊन त्यावर उपचार सुरू करणे महत्त्वाचे असते.’ मनाेविकारांबाबत गुरुग्रामच्या फाेर्टिस हाॅस्पिटलने केलेल्या स्त्री-पुरुष तुलनेत महिलांच्या तुलनेत आपत्कालीन स्थितीत दाखल हाेणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले.
मात्र, हाॅस्पिटलमध्ये राहावे लागण्याचा कालावधी स्त्रियांमध्ये जास्त असताे, अशी माहिती वरिष्ठ मानसाेपाचार सल्लागार डाॅ.
मंताेष कुमार यांनी दिली. ते म्हणाले, ‘आपत्कालीन स्थितीत हाॅस्पिटलमध्ये दाखल हाेणाऱ्यांमध्ये मध्यमवयीन स्त्री-पुरुष जास्त असत. पण, आता तरुण वर्गाचे असे दाखल हाेणे वाढले आहे.’ दिल्लीतील साकेत आणि पंचशील पार्कमधील मॅ्नस हाॅस्पिटलच्या मानसिक आराेग्य विभागाचे प्रमुख डाॅ. समीर मल्हाेत्रा यांच्या म्हणण्यानुसार, झाेपेचे अनियमित वेळापत्रक असलेले तरुण, कामात प्रगती दाखविण्याचा दबाव, शैक्षणिक दबाव आदींमुळे तरुणाईमध्ये मनाेविकार वाढत आहेत. अमली पदार्थांच्या सेवनाचाही परिणाम हाेताे. एकटे राहणारे आणि आर्थिक समस्या असणारे प्राैढही मानसिक विकारांची शिकार हाेतात. असे लाेक आमच्याकडे उपचारांसाठी येतात.
मानसिक विकारांबाबत आपत्कालीन स्थिती कधी उद्भवते, या बाबत नाेएडातील यथार्थ सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलमधील सल्लागार मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. अशिमा रंजन या म्हणाल्या, की एखाद्या व्यक्तीची वागणूक त्याच्या स्वत:सह इतरांसाठीही धाेकादायक हाेऊ लागणे म्हणजे मानसिक विकारांची आपत्कालीन स्थिती असे म्हणता येते.अशा लाेकांचा मूड वारंवार बदलताे.
याची सर्वसामान्य लक्षणे म्हणजे, संबंधित व्यक्तीला भीतीचा झटका (पॅनिक अ‍ॅटॅक) येणे, तिची वागणूक हिंसक हाेणे, तिच्या मनात आत्महत्येचे विचार येणे आदी. या स्थितीत असलेल्या व्यक्तीवर घरी नियंत्रण ठेवणे श्नय नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असते. तेथे त्यांना काही औषधे देऊन त्यांच्या वर्तनावर नियंत्रण आणले जाते.
मनाेविकारामुळे रुग्णालयात दाखल हाेणाऱ्यांची संख्या वाढत असली, तरी त्या निमित्ताने लाेकांमध्ये मनाेविकारांबाबतची जाणीव वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ताण कमी करण्यासाठी संवादाची आणि गरज भासल्यास व्यावसायिक मदत घेण्याचे महत्त्व लाेकांना पटले असल्याचे डाॅ. ऋतुपर्ण घाेष यांनी सांगितले. मात्र, पुरेशी जागरूकताही गरजेची असल्याचे डाॅ. समीर मल्हाेत्रा यांनी नमूद केले. पुरेशा प्रशिक्षित मानसाेपचार तज्ज्ञांची कमतरता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 2023च्या राष्ट्रीय मानसिक विकार सर्वेक्षणानुसार, दर एक लाख लाेकसंख्येमागे देशात 0.7 सायकिअ‍ॅट्र्निस आणि 0.03 ्निलनिक सायकाॅलाॅजिस्ट आहेत.ही संख्या आणखी वाढण्याची गरज डाॅ. शाैनक अज्निंय यांनी व्यक्त केली.